महात्मा फुले महाविद्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी

महात्मा फुले महाविद्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी

अहमदपूर, ( गोविंद काळे)
येथील महात्मा फुले महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने थोर स्वातंत्र्य सेनानी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सतीश ससाणे हे होते. तर, प्रा. दत्ता कांबळे व बाळासाहेब कराड यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.बब्रुवान मोरे यांनी केले तर, आभार इतिहास विभागातील प्राध्यापक डॉ. संतोष पाटील यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!