पती- पत्नीचे भांडण ..सासरे- मेहुण्यांची जावयास मारहाण ;आठ जणांविरुध्द गुन्हा नोंद

पती- पत्नीचे भांडण ..सासरे- मेहुण्यांची जावयास मारहाण ;आठ जणांविरुध्द गुन्हा नोंद

सासरवाडीच्या मंडळीकडून जावायास मारहाण ; आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदपूर ( गोविंद काळे ) शहरातील अंबाजोगाई रोडवरील लक्ष्मीनारायण मंदीरा जवळ शेतीचे अवजारे तयार करणाऱ्या एका व्यापाऱ्याचे आणी त्याच्या पत्नीचे भांडण झाले होते पत्नीने भांडण झाल्याचे माहेरी कळवीताच सासरवाडीच्या मंडळीकडून सासरे, मेहुणे, यांच्यासह आठ जणांनी व्यापाऱ्यास मारहाण केल्याप्रकरणी अहमदपूर पोलीसात सदरील आठ जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे

           याविषयी सविस्तर माहीती अशी की, शिवाजी बाबुराव सरवदे वय ४० वर्षे धंदा व्यापार यांनी अहमदपूर पोलीसात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दि १५ मे रोजी मी नेहमी प्रमाणे माझे दुकान शुभम इंजिनिअरिंग वर्क्स या दुकानात असताना ११:०० वाजेच्या सुमाराम माझी पत्नी सोबत तक्रार झाली होती. तिने तिच्या माहेरी सोनवती येथे माझ्या सासु सासऱ्यास भांडण झाले म्हणुन सांगीतले होते त्यानंतर दुपारी ३:३० वाजता माझे सासरे वामन शिवराम गवळी , मेहुणा विजय वामन गवळी, बालाजी वामन गवळी, पत्नीचा मामा तानाजी घोडके रा मळवटी, तानाजी बनसोडे रा सोनवती , संतोष गडदे रा चापोली , साधु शिवराम गवळी रा सोनवती, अशोक शिवराम गवळी रा सोनवती यांनी माझ्या वर्क शॉप आणी घरामध्ये येऊन मला पत्नी रत्नमाला सोबत नेहमी तक्रार का करतोस? तु तुझ्या आई वडीलांना पैसे का देतोस म्हणुन मला लाथा बुक्यांनी तसेच लोखंडी सळईने माझ्या डोक्यात , डाव्या कानाखाली , उजव्या हाताच्या मनगटावर, उजव्या पायावर, डाव्या पायाच्या टाचेवर , दोन्ही खुब्यावर मारुन मुक्का मार दिला. व माझ्या मुलाला देखील धक्काबुक्की करून मला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देऊन माझ्या घरातील पैसे व सोने पत्नीने त्यांच्या जवळ काढून दिले अशी तक्रार सह्याद्री हॉस्पीटल लातुर येथे उपचार करत असताना पोलीसांना दिली . यावरून अहमदपूर पोलीसांनी सदर आठ जणांविरुद्ध गुरनं ३१६ / २३ भारतीय दंड संहिता १८६० कलम १४3, १४७, १४८, १४९, ३२३, ३२६, ४५२, ५०४, ५०६ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उप- निरिक्षक प्रभाकर अंधोरीकर हे करीत आहे

About The Author