माहेश्वरी सभातर्फे महेश नवमीच्या निमित्य 46 रक्तदात्याचे रक्तदान

माहेश्वरी सभातर्फे महेश नवमीच्या निमित्य 46 रक्तदात्याचे रक्तदान

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर शहरातील लक्ष्मी नारायण मंदिर येथे मारवाडी समाजाच्या वतीने महेश नवमी दिना निमित्य अंबरखाने ब्लड बँक मार्फत रक्तदान शिबाराचे आयोजन केले होते. त्यात 46 रक्तदात्यांनी रक्त दान केले. त्यात 5 महिला व 41 पुरुषांनी रक्त दान केले. माहेश्वरी समाजाची ओळख म्हणजे समाजिक कार्यात सहभागी होने व इतर समाजांना आपले एक समाजिक संघटन समजून कोणतीही कार्यात सहभागी होणारा समाज म्हणून लौकिक आहे. उदगीर शहरात प्रत्येक वर्षी महेश नवमीच्या कार्यक्रमा निमित्य रक्ताच तुटवाडा जाणवणार नाही याची दक्षता घेत समाज रक्तदान करण्यास समोर येतात. विशेष करून सोमाणी परिवारातील 5 जन, लोया परिवारातील 4 जन, नावंदर परिवारातील 4, बाहेती परिवारातील 3, सोनी परिवारातील 3, मुंदडा परिवारातील तीन रक्तदाते सदैव रक्तदानासाठी पुढाकार घेत असतात. महेश नवमी निमित्त देखील या रक्तदात्यासह समाज बांधवानी मिळून 46 रक्तदात्यांनी रक्तदान केले. विशेष नव तरुण पिढीने उत्साहात रक्तदान केले, त्यात पन्नालाल बजाज व रामबिलास नावंदर यांनी आपले 25 वे रक्तदान केले. अनेक जणांनी आपल्या रक्तदानाचं 50 वी पार केली आहे. या रक्तदान शिबिरासाठी माहेश्वरी सभेचे सचिव गोपाल मणियार व प्रदेश कार्यकारणी सदस्य ईश्वरजी बाहेती यांनी परिश्रम घेतले. ब्लड बँकेचे कर्मचारी, डॉक्टर बी.एम.शेटकार ,सचिन कोनाळे, अविनाश बिरादार ,सपना कांबळे ,उमाकांत पांचाल ,विनायक टकटवले व बालाजी खडकखोरे यांनी उल्लेखनीय परिश्रम घेतले. ब्लड बँकेच्या वतीने रक्तदात्यांचा रक्त् दानाचे प्रमाण पत्र देऊन सत्कार करण्यात आला.

About The Author

error: Content is protected !!