यशवंत मध्ये वरिष्ठ लिपिक श्यामसिंग बायस यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार
उदगीर (प्रतिनिधी) : तालुक्यातील वाढवणा बु येथील यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात 37 वर्षे वरिष्ठ लिपिक म्हणून कार्य केलेले श्यामसिंग भगवानसिंग बायस आपल्या प्रदिर्घ सेवेतून सेवामुक्त झाले. त्यांचा संस्थेच्या व यशवंत विद्यालयाच्या वतीने प्राचार्य प्रल्हादराव जाधव यांच्या हस्ते सत्कार करून पुढील आयुष्य आरोग्य संपन्न जावो अशा शुभेच्छा दिल्या.
यावेळी श्यामसिंग बायस यांनी सत्काराला उत्तर देताना आपला जीवनपट सांगितलं व संस्थेचे आभार मानले. प्राचार्य प्रल्हादराव जाधव यांनी श्यामसिंग बायस यांच्या कार्याची भरभरून प्रसंशा केली. सहशिक्षक मंगेश सरदार, जहागीरदार एन. एम. नवनाथ मोरे, प्रा. अतुल जाधव यांनी त्यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले.
या वेळी पर्यवेक्षक प्रा. विरभद्र बिरादार, प्रा. मनोजकुमार माने, किशनराव ढोकाडे, साधू हंबीर, प्रा.रमेश केंद्रे, प्रा. संगम बिरादार, प्रा. उमाकांत कांबळे,प्रा. सुभाष पासमे, प्रा. जयराज बुर्से, प्रा.रविकिरण कांबळे, प्रा. प्रविण रेड्डी, सुरेश देशमुख, प्रविण भिंगोले, मुल्ला सर, बब्रुवान डावळे, संतोष सोमासे, रणजित बयास आदी उपस्थित होते.
