आरोग्यदुत डॉ.माधव चंबुले यांच्या वाढदिवसानिमित्त अतनुरात वृक्षारोपण

आरोग्यदुत डॉ.माधव चंबुले यांच्या वाढदिवसानिमित्त अतनुरात वृक्षारोपण

उदगीर (प्रतिनिधी) : सर्वसामान्या गोरगरिब कुटुंबातील सर्व समाजाप्रती महिलांमध्ये राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया व आरोग्याविषयी जाणीवाजागृती, जणजागरण करून त्यांना अनेक अनिष्ट चालीरितीतून बाहेर काढुन एक आदर्श समाज उभारणीसाठी आजच्या आधुनिक काळातही अनेक आरोग्यदुत तथा देवदुत कार्यरत आहेत. त्यापैकी समाजसेवावृत्तीचे डॉ.माधव वीरप्पा चंबुले हे एक आहेत. त्यांनी उदगीर शहरातील सर्वसामान्य रूग्णांना, पुरूष व महिलांना विविध व्याधीच्या शस्त्रक्रियेतून मुक्ती देण्यासाठी उदयगिरी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल व साई हॉस्पिटल ची निर्मिती केली आहे. उदगीर शहराच्या काही अंतरावर आंध्रप्रदेश-तेलगना-कर्नाटक-महाराष्ट्र सीमावर्ती भागातून व परिसरातील तालुक्यातून येणाऱ्या गोरगरीब, दीन-दलित, पददलित, आठरापगड जातीधर्मातील रूग्णांच्या अखंडित सेवेला अल्पदरात,वेळप्रसंगी मोफत सर्वरोग निदान शिबीराअंतर्गत उदयगिरी किंवा साई हॉस्पिटलचा आधार मिळावा म्हणून हॉस्पिटलची निर्मिती केली. या हॉस्पिटलच्या अंतर्गत मुंबई, पुणे, हैद्राबाद, औंरगाबाद सारख्या उच्च दर्जाच्या हॉस्पिटलला होणाऱ्या महागडया शस्त्रक्रिया येथे समाजसेवावृत्ती देवदुत डॉ.माधव वीरप्पा चंबुले यांच्या वतीने हर्निया, हायड्रोसील शस्त्रक्रिया माफक दरात तर सर्वरोग निदान शिबीराअंतर्गत मोफत केले जातात.हे विशेष आहे.आज दि.१ जून रोजी आरोग्यदुत समाजसेवावृत्तीचे डॉ.माधव वीरप्पा चंबुले यांचा वाढदिवस यानिमित्ताने अतनूर ता.जळकोट येथे संजीवनी समाधी घेणारे श्री.घाळेप्पा स्वामी महाराजांच्या समाधीस व श्री.काशीविश्वनाथ महाराजांच्या मुर्तीस आभिषेक, पुजा, अर्चा, वृक्षारोपण, वृक्षलागवड व संगोपन तसेच साई हॉस्पिटल येथे रूग्णांना फळ वाटप केले.

About The Author

error: Content is protected !!