पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त नांदगाव ग्रामपंचायत ने केला कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी
लातूर (प्रतिनिधी) : लातूर तालुक्यातील नांदगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने येथे दि. ३१ मे २०२३ रोजी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९८ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. मायाताई आनंद पाटील, उपसरपंच शिवाजी उदारे, प्रतिष्ठित नागरिक बब्रुवान गव्हाणे, यांच्या हस्ते अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त ग्रामपंचायत कार्यालय नांदगाव यांच्या वतीने समाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गावातील सौ. ललिता गव्हाने व शिवकांता पोतदार या दोन महिलांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ, रोख रक्कम ५०० रु या स्वरूपात देण्यात आले. यावेळी उपस्थित समाज बांधव जय मल्हार ग्रुप च्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा फोटो भेट देण्यात आला. तसेच उपस्थित समाज बांधव व ग्रामस्थांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

यावेळी लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आनंद पाटील, चेअरमन सतिश कुलकर्णी, व्हा चेअरमन व्यंकट घोडके, ग्रामसेवक शिंदे मडम, ग्रामपंचायत सदस्य रोहित पाटील, अनिता कुलकर्णी, सुनिता वाघमारे, मंदोदरी कुसभागे, संजिवनी कळबंडे, दत्तात्रय कळबंडे व प्रतिष्ठित नागरीक सुधाकर ढमाले, अनंत ढमाले, गोविंद चिगुरे, प्रा. राजाभाऊ माने, ज्ञानेश्वर साळुंके, सुधाकर पाटील, बिरुदादा काळे, लिंबराज कळबंडे, अजिंक्य पाटील, संतोष घोडके, गणेश घोडके, सिद्धेश्वर कळबंडे, बापुराव पाटील तसेच या कार्यक्रमास आशा सेविकासह महिलांची संख्या लक्षणीय होती व इतर गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद चिगुरे यांनी केले. प्रास्ताविकपर मनोगत कैलास जगताप यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत कर्मचारी सतिश सातपुते व रोजगार सेवक बबन उदारे यांनी परिश्रम घेतले.
