सार्वजनिक ठिकाणी जनसामान्यांना सुविधा देणे गरजेचे – सरपंच गुरुनाथ अण्णा बिरादार
उदगीर (एल.पी.उगीले) : सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची याचा मोठ्या प्रमाणात असते, तशा ठिकाणी नागरिकांना बसण्यासाठी सुविधा उपलब्ध होणे गरजेचे मात्र काही ठिकाणी आर्थिक तरतुदी नसल्यामुळे अशा अडचणी दूर करणे कठीण गोष्टीचे गांभीर्य विचारात घेऊन आपण मलकापूर ग्रा.प.च्यावतीने मलकापूर गावाच्या हद्दीतील विविध अस्थापना विभागास खुर्च्या भेट देण्यात आल्या आहेत. किमान अशा ठिकाणी गेल्यानंतर नागरिकांना शांतपणे बसता येईल, साठी आपण मदतीचा हात पुढे केल्याचे मत मलकापूर ग्रामपंचायतचे सरपंच गुरुनाथ अण्णा बिरादार यांनी व्यक्त केले.
उदगीर शहरालगत असलेल्या मलकापूर ग्राम पंचायत च्यावतीने स्वनिधीतून ग्रा.प.हद्दीत चालणार्या अंगणवाडी, सार्वजनिक वाचनालय,पोष्ट ऑफिस आदी विविध अस्थापनांना कामानिमित्य येणार्या नागरिकांची थांबणायाची सोय व्हावी, या उद्देशाने सरपंच गूरुनाथ बिरादार यांनी सर्व विभागाला प्रत्येकी ४ खुर्च्या भेट देण्याचा निर्णय घेऊन अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्य प्रदान करण्यात आल्या. यावेळी सरपंच गुरुनाथ बिरादार,उपसरपंच महेबूब शेख , ग्रामसेवक संतोष पाटिल, ग्रा.प.सदस्य जितेंद्र बोडके,सतिष पाटिल,महेश तोडकर,महानंदा भालेराव,आशाबी महेबूब शेख,चंद्रकला महेकरे, संगीता मोतीपवळे सार्वजनिक वाचनालयाचे सचिव राम मोतीपवळे ,पोष्ट मास्तर राजेश्वर पटणे, अगणवाडी कार्यकर्ती डिगोळे अनुसया जनार्धन, पाटिल भाग्यश्री संजय,किवंडे सारिका माधवराव,स्वामी शोभा शिवराज, लिपिक शिवराज ब्रम्हणा, सय्यद अहमद, अनिल भालेराव,कालिसिंग पवार,समद शेख आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना सरपंच गुरुनाथ अण्णा बिरादार म्हणाले की, कित्येक सामाजिक संस्था आणि सार्वजनिक कामासाठी पुढे येणाऱ्या संस्था यांची आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे ते इच्छा असून देखील नागरी सुविधा पुरवू शकत नाही. मात्र अशा पद्धतीचे काम ज्या संस्था करतात, त्यांना मदतीचा हात देणे स्थानिक स्वराज्य संस्थांचे आद्य कर्तव्य आहे. याची जाण ठेवून फुल ना फुलाची पाकळी म्हणून खुर्च्याच्या रूपाने मदतीचा हात पुढे करत आहोत. भविष्यकाळात जनतेच्या सेवेसाठी पुढे येणाऱ्यांना सतत सहकार्य करण्यासाठी तत्पर आहोत. असे आश्वासनही त्यांनी याप्रसंगी दिले.