श्यामलाल सदैव अग्रेसर, केवळ गुणवंत नव्हे तर आम्ही यशवंत घडवतो – अॅड. सुपोषपाणी आर्य
उदगीर (एल. पी. उगीले) : शैक्षणिक क्षेत्रामध्ये महाराष्ट्राला नवीन पॅटर्न देणाऱ्या शिक्षण प्रणालीची सुरुवात श्यामलाल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयापासून सुरू झाली आहे. ती परंपरा सदैव कायम ठेवत 100% निकाल टिकउन ठेवला आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ते सोबतच त्याच्या व्यक्तिमत्व विकासासाठी विविध उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणाऱ्या स्पर्धांच्या आयोजनातून विद्यार्थी स्वयंपूर्ण बनला पाहिजे, हा दृष्टीकोन शामलालने कायम ठेवला आहे. ती परंपरा कायम ठेवत आजही जिल्ह्यांमध्ये अव्वल येण्याचा मान श्यामलाल स्मारक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मिळवला आहे. असे विचार मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे विधीज्ञ तथा श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुपोषपाणि आर्य यांनी व्यक्त केले. ते विद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यास संबोधन करताना बोलत होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त प्राचार्य एल. पी. उगिले, प्रा. पंडित सुकनीकर, पत्रकार रामभाऊ मोतीपवळे, नावंदर त्यांच्यासह अनेक पालक उपस्थित होते.
पुढे बोलताना आर्य म्हणाले की, श्यामलाल स्मारक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने शंभर टक्के निकालाची आपली परंपरा कायम ठेवत दहावीच्या परीक्षेमध्ये 160 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे. तर 71 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण आहेत. 25 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण आहेत, फक्त दोन विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण आहेत. सर्वसामान्य कुटुंबातून गोरगरीब विद्यार्थी मोठ्या अपेक्षेने गुणवत्ता पूर्ण शिक्षणासाठी शामलाल मध्ये प्रवेश घेतात, त्याचे सार्थक करत शिक्षक वृंदांनी मेहनत घेऊन परंपरा कायम जपली आहे. त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन ही त्यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी बिराजदार सृष्टी बाबुराव हिने शंभर टक्के गुण घेऊन आदर्श निर्माण केल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला. तसेच ताटवाडे सुमित किशोरकुमार, बिराजदार अनुष्का अंतेश्वर, मोदी आर्या प्रेमनाथ, बिरादार रोहित राजकुमार, पाटील श्रेयस संजीव, व्यंजने सृष्टी संजय, सुतार अमित भागवत, रायेवार श्री अविनाश, तांदळे कृष्णा सुहास, चमरगौर पुष्कर मनोजसिंह, सोनकांबळे सायली लक्ष्मण, चेरेकर अथर्व विष्णुकांत, बोरुळे गौरवि ज्ञानेश्वर, शेळके साक्षी राजेंद्र, बिरादार विजय बालाजी, श्रीकंटे राम तुकाराम, पाटील अमृता रणजीत, पारसेवार प्रज्वल बळीराम, म्हेत्रे मोहित मनोजकुमार, कपिकेरे आदित्य वीरभद्र, धोंगडे गजानन शशिकांत, नादरगे अनुष्का प्रशांत, डोंगरे सुरज शरद, तोडकर चैतन्य सुरज, भोसले राधिका लहू, बिरादार मनमत वीरभद्र, स्वामी अनिकेत अंतेश्वर, निडवांचे श्रीगणेश देविदास, बिरादार आभा संतोष, दंडीमे संस्कार सुधाकर, बेंबडे साक्षी राजेंद्र, फुलारी अभय उमाकांत, जाधव आदिती आनंदराव, कन्नाडे सायली रमेश, बासलवार स्वप्नील उत्तम, डोणगापुरे रोहन राचप्पा, कपिकेरे संगमेश्वर शिवाजी, पटेल सदफ गुलाब, पठाण नर्गिस युसुफ, चामले अर्जुन दत्तात्रय, बिराजदार अजय भागवत, भांजी मनमत चंद्रकांत इत्यादी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या उपस्थित विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून बोलताना बिराजदार सृष्टी बाबुराव यांनी आपल्या विद्यालयातील शिक्षकांनी आपल्याला उत्कृष्ट मार्गदर्शन केल्याबद्दल आपण शंभर टक्के गुण प्राप्त करू शकलो, शिक्षक उत्कृष्ट असतील तर विद्यार्थी आपोआप उत्कृष्ट घडतात. असे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमाकांत सूर्यवंशी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राचार्य आनंद चोबळे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी प्रभारी उपप्राचार्य बालाजी चव्हाण, पर्यवेक्षक राहुल लिमये, परीक्षा विभाग प्रमुख सतीश बिरादार, ज्येष्ठ शिक्षक संजू देबडवार, शामार्य कन्या विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक राहुल गुरमे यांनीही उपस्थित विद्यार्थी आणि पालकांचाही सत्कार केला.
