पंडित जवाहरलाल नेहरु माध्यमिक विद्यालय चा १०वी बोर्ड परिक्षेचा 100% निकाल

पंडित जवाहरलाल नेहरु माध्यमिक विद्यालय चा १०वी बोर्ड परिक्षेचा 100% निकाल

उदगीर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च 2023 मध्ये घेतलेल्या माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून पंडित जवाहरलाल विद्यालय, तोगरी चा 100% निकाल लागला आहे. 112 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष प्राविण्यसह 62, प्रथम श्रेणी 35, द्वितीय श्रेणी 13 उत्तीर्ण श्रेणी 2 असे 112 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शाळेचा 100% निकाल लागला आहे. शाळेतुन प्रथम कु श्रृती उत्तम बिरादार 91.80% ,दुसरी कु अर्चना गीरीराव खेळगे 90.80% , व कु गौरवी संतोष बेलूरे 90.80%
गुण घेऊन मुलींचे वर्चस्व निर्माण केले. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेच्या सचिव श्रीमती इंदूताई मनोहरराव येरनाळे, कार्याध्यक्ष महेश मनोहरराव येरनाळे ,प्राचार्या सौ.वंदना महेश येरनाळे , उपप्राचार्य गुणवंत काळगापुरे ,पर्यवेक्षक लक्ष्मण लोभाजी व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले.

About The Author

error: Content is protected !!