विद्यावर्धिनी  हायस्कूलची एस.एस.सी बोर्ड परीक्षेत उत्तुंग भरारी

विद्यावर्धिनी  हायस्कूलची एस.एस.सी बोर्ड परीक्षेत उत्तुंग भरारी

उदगीर (प्रतिनिधी) : प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी येथील किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर द्वारा संचलित विद्या वर्धिनी हायस्कूल मराठी व इंग्रजी माध्यम या शाळेतील विद्यार्थ्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2023 मध्ये संपन्न झालेल्या एस.एस.सी बोर्ड परीक्षेत उत्तुंग भरली घेतली असून विद्यालयाचा निकाल 97.71 टक्के लागला आहे. संस्कृत विषयांमध्ये 100 पैकी 100 गुण घेणार 21 विद्यार्थी असून गणित विषयांमध्ये 100 पैकी 100 गुण घेणाऱ्या 10 विद्यार्थी आहेत. 100% गुण घेणारे  4 विद्यार्थी असून त्यामध्ये उत्कर्षा अरविंद पाटील100%, श्वेता बापूराव डिगोळे100%,  जान्हवी सुमंत बिरादार100% भोसले जानकी लक्ष्मण 100% , विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.बोर्ड परीक्षेत एकूण 513 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यामध्ये विशेष प्राविण्य 254 विद्यार्थी, द्वितीय श्रेणी ८४ विद्यार्थी, तसेच तृतीय श्रेणी 13 विद्यार्थ्यांनी यश संपादक केले असून यशस्वी विद्यार्थ्यांचे किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर, सचिव ज्ञानदेव झोडगे,सहसचिव माधवराव पाटील, कोषाध्यक्ष नामदेवराव चामले यांच्यासह संस्थेचे सर्व कार्यकारणी सदस्य, पदाधिकारी व विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.बी नागरवाड, परीक्षा विभाग प्रमुख बाबासाहेब पाटील, बंडू पाटील,कला शिक्षक एन.आर जवळे, कार्यालयीन प्रमुख डी.पी सूर्यवंशी इ. अभिनंदन केले असून यशस्वी गुणवंत ज्ञानवंत विद्यार्थ्यांचे सर्व सरातून अभिनंदन होत आहे.

About The Author

error: Content is protected !!