समर्थ विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश
उदगीर : तालुक्यातील एकुर्का रोड येथील समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मार्च २०२३ च्या इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले असून विद्यालयाच्या एकूण निकाल ९५. ५ टक्के लागला आहे.
वैष्णवी गोविंद जाधव हि विद्यार्थींनी ९२ टक्के गुण घेऊन शाळेत प्रथम आली आहे. बबिता श्रीराम मुंढे ही ९१.८ टक्के गुण घेऊन व्दितीय तर गायत्री महादेव लामतुरे ही ९१.६ टक्के गुण घेऊन तृतीय आली आहे. परीक्षेस १३६ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. १३० उत्तीर्ण झाले आहेत. विशेष प्राविण्यात ७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. प्रथम श्रेणीत ४८ तर द्वितीय श्रेणीत ७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थासचिव प्राचार्य प्रमोद चौधरी, पर्यवेक्षक सिद्धार्थ बोडके, संस्था सदस्य प्रा. एम. व्ही. स्वामी, जेष्ठ प्रा. बी. एस. बाबळसुरे, रसूल पठाण याच्यांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
