सिद्धी शुगरचे संचालक व व्यवस्थापकीय संचालक ब्राझील दौऱ्यावर

सिद्धी शुगरचे संचालक व व्यवस्थापकीय संचालक ब्राझील दौऱ्यावर

अविनाश जाधव व प्रफुल होनराव यांना ब्राझील दौऱ्यासाठी आमदार बाबासाहेब पाटील यांच्याकडून शुभेच्छा.

अहमदपूर ( गोविंद काळे ) : सिद्धी शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लि, महेशनगर, उजना. ता. अहमदपुर जि.लातूर, हा साखर कारखाना ४००० टी.सी.डी./ प्रतिदिन गाळप क्षमतेचा असुन ६० के.एल.पी.डी आसवणी प्रकल्प कार्यान्वीत करण्यात आला आहे. याबरोबरच सिद्धी शुगरचे संचालक अविनाश जाधव व व्यवस्थापकीय संचालक प्रफुल्ल होनराव हे ब्राझील दौऱ्यावर जात असून यांचा आमदार बाबासाहेब पाटील यांनी यथोचित असा सन्मान करुन शुभेच्छा देण्यात दिल्या आहेत.

या वर्षी कारखान्याचा १२ वा गळीत हंगाम असुन ४ था आसवणी हंगाम आहे. दि. ४ जून २०२३ ते ११ जून २०२३ या कालावधीत नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटीव्ह शुगर फॅक्ट्रीस लि. नवी दिल्ली, यांनी आयोजित केलेला ब्राझीलच्या अभ्यास दौऱ्या मध्ये ऊस उत्पादन, ऊस गाळप, डिस्टीलरी, इथेनॉल आणि स्पेंटवॉश बद्दल अधिक नाविन्यपूर्ण माहितीसाठी देशातील विविध राज्यातील साखर उत्पादन घेणाऱ्या सहकारी व खाजगी असे मिळुन १४-१५ कारखान्यांचे प्रतिनिधींचा समावेश आहे.

सिद्धी शुगर चे मॅनेजींग डायरेक्टर अविनाश (भैया) जाधव व व्हाईस प्रेसिडेंट प्रफुल्ल होनराव हे जात असल्याने त्यांचा सत्कार अहमदपुर- चाकुर तालुक्याचे आमदार तथा सिद्धी शुगरचे चेअरमन बाबासाहेबजी पाटील व सुरज भैय्या पाटील संचालक सिद्धी शुगर व उपसरपंच शिरूर ताजबंद यांच्या समवेत इतर मान्यवरांनी उपस्थित राहून ब्राझील दौऱ्यासाठी शुभेच्छा दिल्या.

About The Author

error: Content is protected !!