केंद्रेवाडीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण

केंद्रेवाडीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण

अहमदपूर ( गोविंद काळे ) : तालुक्यातील मौजे केंद्रेवाडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे निमित्त साधून महाराष्ट्र शासनाकडून प्रत्येक गावातील प्रत्येकी दोन महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार दिला गेला यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करून गावातील श्रीमती संगीता शिवहार कोडमंगल व सौ अरुणा जगन्नाथ केंद्रे या दोन महिलांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला त्या गावपातळीवर समाजात करत असलेल्या सामाजिक कार्यामुळे त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी गावच्या सरपंच सौ ज्योती माधव केंद्रे उपसरपंच सौ ज्योती बालाजी केंद्रे ग्रामसेवक मोहनजी केंद्रे ग्रामपंचायत सदस्य सौ .इंद्रायणीताई भानुदास केंद्रे सौ पुष्पा प्रकाश केंद्रे हे उपस्थित होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त केंद्रप्रमुख माधवराव केंद्रे प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक भानुदास गुरूजी केंद्रे ह भ प भागवत महाराज केंद्रे अंगणवाडीताई रंजना केंद्रे मुक्ताताई फड, उषाताई केंद्रे शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष विष्णुदास मोरे वैजनाथ केंद्रे हभप धनंजय महाराज केंद्रे आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक माधव केंद्रे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य ज्ञानोबा भास्कर केंद्रे यांनी केले आभार प्रदर्शन प्रेम कुमारकाकडे यांनी केले.

About The Author

error: Content is protected !!