महात्मा फुले महाविद्यालयात ‘यचममुवि’ च्या परीक्षा सुरळीत सुरू

महात्मा फुले महाविद्यालयात 'यचममुवि' च्या परीक्षा सुरळीत सुरू

महात्मा फुले महाविद्यालयाने राबविला काॅपी मुक्तीचा अनोखा प्रयोग

अहमदपूर ( गोविंद काळे) : ‘ज्ञानगंगा घरोघरी’ हे ब्रीद घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना येथील महात्मा फुले महाविद्यालयात केंद्र प्रमुख तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरळीतपणे सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे या परीक्षा १००टक्के कॉपीमुक्त वातावरणात घेण्यात येत असून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत पाटील यांनी यासाठी भरारी पथकांची तसेच तपासणी पथकांची विशेष नियुक्ती केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना निर्भय आणि मुक्त वातावरणात परीक्षा देता येत आहे.
या परीक्षा केंद्रावर परिसरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालय सांगवी, मोहनराव पाटील अध्यापक महाविद्यालय, शिरुर ताजबंद , महात्मा फुले महाविद्यालय किनगाव आणि महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर येथील विद्यार्थी परीक्षा देत असून दररोज या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास २५० च्या वर आहे. बी. ए., बी.एड., पत्रकारिता प्रशिक्षण बी. जे. पदवी, योग शिक्षक पदवी, शाळा व्यवस्थापन व बालसंगोपन पदवी आदी वर्गातील विद्यार्थी परीक्षा देत आहेत. या परीक्षांसाठी विद्यापीठाने सहकेंद्र प्रमुख म्हणून शिरूर अनंतपाळ येथील शिवनेरी महाविद्यालयातील समाजशास्त्राचे प्रा. डॉ. दत्ता कांबळे यांना नेमणूक दिली असून केंद्रप्रमुख तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील, केंद्र संयोजक डॉ. अनिल मुंढे, केंद्र सहाय्यक डॉ. संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा सुरळीतपणे सुरू आहेत.

About The Author