अहमदपूरात स्व. गोपीनाथराव मुंडे यांची पुण्यतिथी साजरी

अहमदपूरात स्व. गोपीनाथराव मुंडे यांची पुण्यतिथी साजरी

अहमदपूर( गोविंद काळे ) : माजी केंद्रीय मंत्री स्व. गोपीनाथराव मुंडे यांची अहमदपूर मध्ये पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
अहमदपूर शहरातील लातूर ते नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील स्व. गोपीनाथराव मुंडे चौकात भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या हस्ते पुजन करून स्व. गोपीनाथराव मुंडे यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक काका केन्द्रे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गिरी, माजी तालुका अध्यक्ष रामभाऊ बेल्लाळे, अॅड. अमित रेड्डी, प्रदेश सदस्य हेमंत गुट्टे,व्यंकट इप्पर,गणेश मुंडे, रामानंद मुंडे,आनंद गुट्टे, रामानंद मुंडे, हरी रामचंद्र गुट्टे, परमेश्वर सोडगिर यांच्या सह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
किनगाव, पाटोदा येथेही स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री विनायकराव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक काका केन्द्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य त्र्यंबकआबा गुट्टे, विठ्ठलराव बोडके, सुनील वाहुळे,भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गिरी,रामभाऊ बेल्लाळे, व्यंकट इप्पर,विक्रम नारागुडे, नागेश भिकाणे,अनिल केंद्रे ,व्यंकट दहिफळे, बंडू श्रृगांरे,शंकर देवकते, यांच्या सह किनगाव, पाटोदा, मानखेड, धानोरा, देवकरा,विळेगाव, मोळवण , व किनगाव परीसरातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

About The Author