दिव्य श्रीमद् भागवत कथेची भागवताचार्य, दिलीपजी महाराज मुसळे यांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता.

दिव्य श्रीमद् भागवत कथेची भागवताचार्य, दिलीपजी महाराज मुसळे यांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता.

किनगाव ( गोविंद काळे ) अहमदपूर तालुक्यातील मोळवण धाकटे येथे चालु असलेल्या दिव्य श्रीमद् भागवत कथेची भागवताचार्य, दिलीपजी महाराज मुसळे यांच्या काल्याच्या किर्तनाने नुकतीच सांगता झाली

अहमदपूर तालुक्यातील मोळवण धाकटे येथे श्री, ह,भ,प,दिलीप महाराज मुसळे यांच्या पारमार्थिक सेवेच्या रौप्यमहोत्सवा निमित्त चालु असलेल्या दिव्य श्रीमद् भागवत कथा,गाथा पारायण सोहळा तथा किर्तन महोत्सवाची सांगता भागवताचार्य, दिलीप महाराज मुसळे यांच्या काल्याच्या किर्तनाने नुकतीच झाली यावेळी महाराजांनी उपजोनिया पुढती येऊ।काला खाऊ दहिभात।।या तुकाराम महाराजांच्या अभंगावर काल्याचे किर्तन संपन्न झाले, महाराजांनी किर्तनात सप्ताहात सात दिवस आलेल्या किर्तनकारांचे व गायकांचे व गुणीजनांचे व सात दिवस सहकार्य केलेल्या सर्वांचा सन्मान केला या वेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, व परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते

About The Author

error: Content is protected !!