अहमदपूरात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न .

अहमदपूरात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न .

अहमदपूर ( गोविंद काळे )

येथील रायगड मित्र परिवार व जोशी कोचिंग क्लासेस फुले नगर अहमदपूर च्या संयुक्त विद्यमाने 10 वी 12 वी परीक्षेतील गुणवंत विध्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री विनायकराव पाटील,माजी आमदार बब्रुवान खंदाडे,पोलीस उपअधिक्षक मणिषजी कल्याणकर,सेवा निवृत्त मुख्याध्यापक देवेंद्र देवणीकर यांच्या हस्ते जोशी क्लासेस येथे संपन्न झाला.
दहावी व बारावी परीक्षेत 100 % गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रु 1100 रु. मकरंद जोशी यांच्या तर्फे बक्षीस म्हणून देण्यात आले .या कार्यक्रमात नुकत्याच पार पडलेल्या कृषी उत्त्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत व्यापारी गटातून निवडून आलेले धनराज पाटील , विलास शेटे यांचा ही गौरव करण्यात आला. रायगड परिवाराचे मार्गदर्शक सूर्यकांत भोसले यांना सेवापुर्ती निमित्य मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या भावस्पर्शी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक देवेंद्र देवनीकर होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री विनायकरावजी पाटील , माजी आमदार बब्रुवान खंदाडे ,पोलीस उपअधिक्षक मणिषजी कल्याणकर,भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंदराव गिरी हे होते .
यावेळी पुंडलिकराव जोशी,प्रा.गोविंदराव शेळके , सोसायटीचे संचालक विजयकुमार पाटील , दयानंद घाटोळ , मिलिंद जोशी , अनील फुलारी, संगमेश्वर निला, मुकुंद जोशी , अंजया गौंड, मुकुंद सूर्यवंशी , गोविंद हिवरे ,पपु गुरव , गणेश हालसे ,रवी भोसले ,पुंडलिक सांगवीकर यांच्या सह गुणवंत विद्यार्थी, पालक,रायगड मित्र परिवाराचे सदस्य यावेळी उपस्थित होते .

About The Author

error: Content is protected !!