महात्मा फुले महाविद्यालयात पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्र सुरू
अहमदपूर, ( गोविंद काळे )
येथील महात्मा फुले महाविद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीचे औचित्य साधून ३१ मे २०२३ रोजी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राची स्थापना करण्यात आली.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र व डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र सुरू करण्यात आले असून, या केंद्राला मिळत असलेला प्रतिसाद पाहून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राची स्थापना करण्यात आली. या केंद्राच्या संचालक पदी हिंदी विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ.पांडुरंग चिलगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील यांचे तसेच संचालक डॉ. पांडुरंग चिलगर यांचे किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीरच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.