एसएससी परीक्षेत विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण ; सांची वाघमारे चा शिक्षकांनी केला सत्कार

एसएससी परीक्षेत विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण ; सांची वाघमारे चा शिक्षकांनी केला सत्कार

अहमदपूर ( गोविंद काळे )
आंबेजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयाची विद्यार्थिनी सांची सत्यपाल वाघमारे ही एसएससी परीक्षेत घरची अतिशय खडतर परिस्थिती असूनही शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन घेऊन स्वअध्ययन करून तिने 87.40 टक्के गुण घेऊन विशेष प्राविण्यासह शालांत परिक्षा उत्तीर्ण केली यामुळे तिचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे
या अगोदरही इयत्ता आठवी मध्ये सांची ही स्कॉलरशिप आणि एन एम एम एस या परीक्षाही विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण होऊन जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत आली होती
याचे औचित्य साधून शाळेतील सर्व शिक्षक प्रामुख्याने मुख्याध्यापक धावारे सर वर्गशिक्षक सूर्यवंशी सर ,परळकर सर धुमाळ सर ,जोगदंड सर, साठे सर ,पांचाळ सर , अंबाड सर ,घुगे सर यांनी घरी येऊन तिचा व तिच्या पालकाचा सहृदय सत्कार करून अभिनंदन केले व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या
सांची ही सामजिक तथा धार्मिक कार्यकर्ते आदर्श शिक्षक ,पत्रकार सत्यपाल वाघमारे यांची कन्या आहे

About The Author

error: Content is protected !!