ओम् साई संस्थेचा वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
उदगीर : तालुक्यातील तोंडार येथील नेहरू मेमोरियल हायस्कूल शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ओम् साई संस्थेचा वतीने करण्यात आला.
ग्राम शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नेहरू मेमोरियल हायस्कूल शाळेचा निकाल 93.61%लागला असुन या मध्ये केंद्रात प्रथम क्रमांक पटकाविलेला विद्यार्थी प्रेम राजेश्वर भांजी 98.20% गुण घेऊन यश संपादन केले आहे,तर स्वरूप दिलीप पाटील याने 95.80% घेउन द्वितीय क्रमांक पटकाविलेला आहे,व सार्थक बस्वराज बिरादार याने 94.40% गुण घेऊन तृत्तीय क्रमांक पटकाविलेला आहे, त्याच बरोबर प्रथम श्रेणीत कु.लिंबाळे प्रतिभा राजकुमार या विद्यार्थीनींने 90.0% गुण , स्वामी पुनम परमेश्वर 87.60% गुण प्राप्त करून यश संपादन केल्याबद्दल तोंडार येथील सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यात सहभागी होणाऱ्या ओम् साई सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवकुमार पांडे यांनी उदगीर येथे गुणवंत विद्यार्थ्यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात केले. व त्यांचा पालकांचा ही पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, या वेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवकुमार पांडे, संस्थेचे सदस्य कैलास खिंडे, शिवलिंगप्पा नावंदे, विरभद्र बिरादार,नंदय्या स्वामी, निळकंठ बिरादार, गोविंद पांडे, संदीप बिरादार, रामेश्वर बिरादार, संग्राम भिंगोले,ई सह माजी उपसरपंच प्रल्हाद पाटील, पालक राजेश्वर भांजी, बस्वराज बिरादार, अंकुश बिरादार,लिंगराम पांडे, अमोल पटवारी, दिलीप पाटील यांच्या उपस्थितीत हा गुण गौरव सोहळा पार पडला, या वेळी गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी व शैक्षणिक जिवनासाठी संस्थापक अध्यक्ष शिवकुमार पांडे यांनी शुभेच्छा दिल्या.