दहावी बोर्ड परीक्षेच्या निकालात इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसने घडवीला नवीन इतिहास

दहावी बोर्ड परीक्षेच्या निकालात इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसने घडवीला नवीन इतिहास

उदगीर(एल.पी.उगीले) : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी धडपडणाऱ्या, उदगीरच्या शैक्षणिक क्षेत्रात सतत अग्रगण्य असलेल्या इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसने मागील तब्बल 15 वर्षपासून शैक्षणिक क्षेत्रात नवनवीन इतिहास घडवून उदगीरचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात गाजवले आहे. नुकत्याच लागलेल्या दहावी बोर्ड परीक्षेच्या निकालात इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसच्या तब्बल 11 विद्यार्थ्यांनी 95% पेक्षा जास्त गुण मिळवले असून 43 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा जास्त गुण मिळवलेले आहेत. कु.अनुष्का बिरादार ही विद्यार्थिनी गणितात 100पैकी 100, विज्ञान मध्ये 100 पैकी 100 व इंग्रजी विषयात 100पैकी 99 गुण घेऊन तिन्ही विषयात सर्वप्रथम येण्याचा बहुमान मिळवली आहे. चि.यश गुडेवार हा विद्यार्थी इंग्रजीत 96 गुण घेऊन विद्यावर्धिनी शाळेतून सर्वप्रथम आला आहे तर चि.खान मोहम्मद आरिफ हा विद्यार्थी जमहूर हायस्कूल मधून सर्व प्रथम आला असून, कु.गायत्री हुडगे ही विद्यार्थिनी संग्राम स्मारक विद्यालयातून सर्वद्वितीय आली आहे. हा निकाल पाहून असेच म्हणावे लागेल की, इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसने पुन्हा एकदा शैक्षणिक क्षेत्रात नवीन इतिहास घडवीला असून पुन्हा एकदा उदगीरचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात गाजवले आहे. क्लासेसचे विद्यार्थी अनुष्का बिरादार, यश गुडेवार, राजनंदिनी बिरादार, खान मोहम्मद आरिफ, कपिल बिराजदार, स्वाती बिच्चे, तनुश्री बिरादार, अमृता पाटील, शिवम शेटकार, राहीन मोमीन, नम्रता डारनुळे, अमित नवाडे, सेजल स्वामी, गायत्री हुडगे, स्वरांजली कांबळे, श्रेया देवणे, महेश जाधव, जय मोरे, ओमकार गालचेलवार, गणेश सातबीगे, रुद्रानी किवंडे, अदिती कानवटे, श्रद्धा माने, शिवकांत पाटील, दिक्षा घडले, अंकिता भिंगे, रोहित भिंगोले, विश्वराज श्रीवास्तव, सत्यजित सोनकांबळे, रोशन चव्हाण, नंदकुमार धनासुरे, साईनाथ जावरे, ऋषिकेश चंदे, प्रदीप परिहार, शिवप्रसाद बिरादार, दिग्विजय निम्मलवाड इत्यादी विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. या घवघवीत व अतुलनीय यशाबद्दल इच्छापूर्तीचे संचालक तथा गणिताचे अध्यापन करणारे प्रा.सिद्धेश्वर पटणे, इंग्रजीचे अध्यापन करणारे प्रा.संजय जामकर व विज्ञानचे अध्यापन करणारे प्रा.आशरफ खान यांचे, तसेच सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

About The Author