लोकाधिकार संघाच्या वतीने ४२८ आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड वाटप

लोकाधिकार संघाच्या वतीने ४२८ आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड वाटप

हरंगुळ : लोकाधिकार संघाच्या वतीने आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड नोंदणी व कार्ड वाटप अभियानचा शुभारंभ श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हरंगुळ (बु.) येथे संपन्न झाला.
हे अभियान दोन दिवस घेण्यात आले. या दोन दिवसात ४२८ नागरिक बंधू-भगिनींना आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड ची नोंदणी करून घेऊन ते कार्ड वाटप करण्यात आले.
लोकाधिकार संघाच्या वतीने आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड नोंदणी व कार्ड वाटप अभियानचा शुभारंभ हरंगुळ येथील अंगदराव काशिनाथराव पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
याप्रसंगी उद्घाटनपर बोलताना अंगदराव पाटील म्हणाले की, लोकाधिकार संघाच्या माध्यमातून लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी सर्वसामान्य लोकांना आणि गोरगरीब लोकांना अत्यंत आवश्यक असे आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड देण्यासाठी हे अभियान सुरू करून खूप चांगले काम केले आहे. पनाळे यांच्या माध्यमातून गावातील गोरगरीब जनतेला अनेक योजनांचा लाभ मिळत आहे. त्यांच्या हातून असेच कार्य घडत राहो अशा भावना उद्घाटनपर भाषण करताना अंगदराव पाटील यांनी व्यक्त केल्या.
याप्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड ही योजना देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सुरू करून गोरगरीब जनतेला मोठे जीवदान दिले असल्याची माहिती सांगितली. आयुष्यमान भारत हेल्थकार्डच्या नोंदणीसाठी आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल सोबत असणे आवश्यक असल्याचे सांगून या आयुष्यमान कार्डमुळे सर्वसामान्य माणसाला मोठा आधार मिळणार असल्यामुळे आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड ची नोंदणी करून घेऊन याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा, असेही आवाहन व्यंकटराव पनाळे यांनी केले.
सर्वसामान्य आणि गोरगरीब माणसांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी नेहमीच लोकाधिकार संघ सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या सोबत असल्याचे सांगून कोणत्याही प्रकारच्या अडचणी असो किंवा शासन स्तरावरील गोरगरिबांचे काम कोणी मस्तवाल अधिकारी अडवत असेल तर लोकाधिकार संघ अशा अधिकाऱ्याच्या मानगुटीला धरून गोरगरिबांचे काम करून घेतल्याशिवाय राहणार नाही, असेही ठासून लोकाधिकारप्रमुख तथा हरंगुळ चे माजी सरपंच व्यंकटराव पनाळे यांनी सांगितले.
कार्यक्रमास विश्वनाथराव झुंजारे, सुरेश माळी, निवृत्तीराव तीगीले, ग्रामपंचायत सदस्य सतीश सुरकुटे, महारुद्र वाघमारे, सचिन इगे, विलास गोडसे पाटील, विनोद जटाळ, स्वप्निल माळी, गणेश सगर, पत्रकार बाळू बुद्धे, सादिक शेख, अमर बेंबडे, बाबुराव कोतवाड, वीरभद्र माळगे, अर्जुन वाघमारे पाटील, राजाभाऊ आयलाने, संतोष वाघमारे, ज्ञानेश्वर कोतवाड, पांडुरंग गुरमे, गोरोबा काका शेळके, संतराम जटाळ, मदन तिगीले, सोमनाथ पाटील, सुलचंद माळी, ज्ञानेश्वर कसपटे, बाबुराव व्हटे, तुकाराम तिगीले, हरिश्चंद्र शेळके, राहुल वाघमारे, जालिंदर कांबळे, कमलाकर जटाळ, राम पाटील, डॉ. रामलिंग सुरवसे, प्रल्हाद सुरकुटे आदी सह अनेक नागरिक बंधू-भगिनी उपस्थित होते. अभियानाचे आयोजन संतोष पनाळे यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी गोरे यांनी केले.

About The Author