रुक्‍मिनबाई तगाळे यांचा जिव्हाळा परिवारातर्फे सत्कार

रुक्‍मिनबाई तगाळे यांचा जिव्हाळा परिवारातर्फे सत्कार

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील जिव्हाळा ग्रुप सामाजिक बांधिलकी जपणारा,दुःखितांचे दुःख जाणणारा परिवार म्हणून संबोधला जातो.ज्येष्ठ आणि वयोवृद्ध व्यक्तीचा सन्मान व गौरव करण्याचं आयोजन परिवारा मार्फत करण्यात आले होते.

जिव्हाळा ग्रुपचे सदस्य आदर्श शिक्षक तथा पत्रकार सुभाष गोविंदराव तगाळे यांच्या शंभरीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या मातोश्री, रुक्मिणीबाई गोविंदराव तगाळे यांचा जिव्हाळा परीवार मार्फत सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी देविदासराव नादरगे, प्रमुख पाहुणे.डॉ. पवार,कलावती भातंबरे,सुरेंद्र अक्कनगिरे उपस्थित होते.

या प्रसंगी विश्वनाथराव मुडपे,डॉ.मध्वरे,ज्येष्ठ पत्रकार अंबादास आलमखाने यांनी आईची सेवा व महती सांगणारे मनोगत सादर करुन मातोश्रीला निरोगी दीर्घायुष्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करण्यात आली, तसेच पतंजली योग समिती उदगीरच्या वतीनेही मातोश्रीचा सत्कार करण्यात आला. यावेळी जावई ज्ञानोबा चव्हाण, मुली निर्मला डावळे,सत्यभामा चव्हाण,नातू सुमित तगाळे, स्नेहा तगाळे,राम पाटील, प्रसाद पाटील, जिव्हाळा उपाध्यक्ष विश्वनाथ माळेवाडीकर , चंद्रकांत भद्रे, सोपानराव माने ,नवनाथ पाटील,शरणप्पा खेळगे,पांडुरंग बोडके, हावगीराव आचार्य,ज्ञानोबा कोटलवार, चंद्रकांत वट्टमवार, सचिन बापुरे,शिवमुर्ती भातांबरे,व्ही.एस कुलकर्णी,चंद्रकांत रोडगे, मारुती रोडगे,चंद्रकांत पांचाळ,भागवत सोनटक्के, गंगाधर स्वामी, प्रशांत आचार्य,दासरवाड ,सुवर्णकार ,भंडारे ,आळंदे ,भंगवाड सहअनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमाकांत बनशेळकीकर यांनी तर आभार सुभाष तगाळे यांनी केले.

About The Author

error: Content is protected !!