शेतकरी गटांना सोयाबीन मिनी किटचे वाटप

शेतकरी गटांना सोयाबीन मिनी किटचे वाटप

अतनूर (प्रतिनिधी) : कृषी विभागामार्फत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान गळीत धान्य योजनेअंतर्गत मौजे अतनूर, चिंचोली व मेवापूर येथील आत्मा अंतर्गत स्थापित शेतकरी गटांना सोयाबीन मिनी किटचे वाटप करण्यात आले.
मौजे अतनूर येथील कुणबी शेतकरी गट, लक्ष्मी शेतकरी कृषी बचत गट, व्यंकटेश शेतकरी गट, साईबाबा शेतकरी गट व जय भवानी शेतकरी गट व मौजे मेवापूर येथील स्वामी समर्थ शेतकरी गट, मौजे चिंचोली येथील भक्त प्रल्हाद शेतकरी गट यांना सोयाबीन मिनी किटचे वाटप करण्यात आले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी अनिल गीते, कृषी पर्यवेक्षक नानासाहेब धुपे, कृषी सहाय्यक संदीप पाटील, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक अभिलाष क्षीरसागर, शेतकरी गटाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व शेतकरी सदस्य यांच्या उपस्थितीत सदरील गटांना सोयाबीन मिनिट चे वाटप करण्यात आले. यावेळी कृषी सहाय्यक संदीप पाटील यांनी सोयाबीन पिकाची पेरणी करते वेळी सोयाबीन पिकाची उगवण क्षमता करून व सोयाबीन बीज प्रक्रिया करून पेरणी करावी. असे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले.

About The Author