केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवतजी कराड यांचा अहमदपूर मध्ये सत्कार.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवतजी कराड यांचा अहमदपूर मध्ये सत्कार.

अहमदपूर ( गोविंद काळे ) : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री ना. डॉ. भागवतरावजी कराड यांचा भारतीय जनता पक्षाचे अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी सत्कार केला.
केंद्रीय मंत्री भागवतजी कराड हे संभाजीनगर हून बीड अहमदपूर मार्गे नांदेड येथील कार्यक्रमास जात असताना अहमदपूर येथील उपस्थित सर्व नेत्यांना व कार्यकर्त्यांना येथील शासकीय विश्राम गृहामध्ये धावती भेट देऊन विविध राजकीय विषयावर चर्चा केल्यानंतर अहमदपूर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी केंद्रीय मंत्री भागवतराव कराड यांचा सत्कार केला.
यावेळी खासदार सुधाकर श्रृगांरे, माजी मंत्री विनायकराव पाटील, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आ. रमेश अप्पा कराड, माजी आमदार बब्रवान खंदाडे, माजी आमदार पाशा पटेल, भाजपाचे लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख दिलीपराज देशमुख,प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक काका केन्द्रे,प्रा. टी. पी. मुंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जिवणकुमार मद्देवाड,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गिरी, तालुका अध्यक्ष हणमंत देवकते, माजी अध्यक्ष रामभाऊ बेल्लाळे, डॉ. सिद्धार्थकुमार सुर्यवंशी, रामभाऊ नरवटे, माजी उपसभापती कमलाकर पाटील, बालाजी गुट्टे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते

About The Author