सहाय्यक कल्याण अधिकारी पदावर नियुक्ती द्या: उच्च न्यायालय
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी): याचिककर्त्यास महानिर्मिती कंपनी मध्ये सहाय्यक कल्याण अधिकारी या पदावर नियुक्ती देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले.
प्रकरणाची थोडक्यात माहिती अशी की, शरद राठोड यांनी महानिर्मिती कंपनी मध्ये सहाय्यक कल्याण अधिकारी या पदा करिता जाहिराती नंतर रीतसर अर्ज केला. मुलाखती नंतर त्यांना प्रतीक्षा यादी क्रमांक एक वर ठेवण्यात आले, आणि कागदपत्रे पडताळणीसाठी बोलवण्यात आले. कागदपत्रं पडताळणीवेळी मूळ निवड झालेली उमेदवार अनुपस्थित राहीली.
श्री राठोड यांनी मूळ उमेदवार अनुपस्थितीमुळे अपात्र ठरल्यामुळे सदर जागेवर नियुक्ती द्यावी. अशी विनंती केली.
महानिर्मिती कंपनी ने त्यांना नियुक्ती दिली नाही. सदर नाराजीने त्यानी ऍड. अजिंक्य रेड्डी यांच्या मार्फत उच्च न्यायालय नागपूर मध्ये रिट याचिका दाखल केली.
सुनावणीअंती न्या. ए. एस. चांदूरकर आणि न्या. एम.डब्ल्यू. चंदवानी यांनी सदर प्रकरणी महानिर्मिती कंपनी द्वारे नियुक्ती आदेश देण्यात अक्षम्य विलंब झाला असून तसेच इतर उमेदवार यांना याचिका प्रलंबित असताना देखील नियुक्ती केली, असे निष्कर्ष नोंदवत याचिककर्त्यास सहाय्यक कल्याण अधिकारी पदावर नियुक्ती देण्याचे आदेश दिले. सदर प्रकरणी राठोड यांच्या वतीने ऍड. अजिंक्य रेड्डी यांनी काम पाहिले. त्याना ऍड. विश्वजित वानखेडे यांनी सहकार्य केले.