डॉ भा.सो.आंधळे यांची स्वारातीविच्या अभ्यास मंडळावर नियुक्ती

डॉ भा.सो.आंधळे यांची स्वारातीविच्या अभ्यास मंडळावर नियुक्ती

अहमदपूर( गोविंद काळे ) तालुक्यातील सांगवी येथील पु अहिल्यादेवी अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ भाऊसाहेब सोपान आंधळे यांची स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या आंतरविद्याशाखीय अभ्यास मंडळाच्या सदस्य पदी निवड झाली.या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके पाटील यांच्या हस्ते सत्कार झाला.यावेळी संस्थेच्या सचिव तथा भाजपाच्या महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस रेखाताई तरडे हाके पाटील, संस्थेच्या उपाध्यक्षा ॲड मानसी हाके, कोषाध्यक्ष अमरदीप हाके, संचालक कुलदीप हाके, संचालक सुरेंद्र चाकूरकर आदीसह सर्व शाळेतील मुख्याध्यापक तथा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.

About The Author

error: Content is protected !!