गुणवत्तेला मेहनती शिवाय पर्याय नाही..!-डाॅ.सिद्धार्थकुमार सूर्यवंशी

गुणवत्तेला मेहनती शिवाय पर्याय नाही..!-डाॅ.सिद्धार्थकुमार सूर्यवंशी

अहमदपूर ( गोविंद काळे ) : गुणवत्ता ही आता कोणाची मक्तेदारी असत नाही त्या साठी कठोर मेहनत घ्यावी लागते.यशासाठी कूठलाच शाॅर्टकट असत नाही असे प्रतिपादन युवक नेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी केले.

किलबील नॅशनल स्कूल येथे नूकताच गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा आयोजित केला होता य सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक ज्ञानोबा भोसले होते.तर प्रा.रूपेश कांबळे,प्राचार्य संतोष पाटील,महावीर गोडभरले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पूढे बोलताना डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी म्हणले की,
आज मोठ्या प्रमाणात स्पर्धा वाढली आहे.या स्पर्धेत टिकण्यासाठी प्रचंड मेहनतीची तयारी असने गरजेचे आहे.तसेच केवळ मार्कवान न बनता गुणवान बनण्यासाठी प्रयत्न करावा असेही शेवटी म्हणाले.
या कार्यक्रमात इयत्ता दहावी मध्ये विशेष प्रावीण्यात उतिर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच शिक्षकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या प्रसंगी सर्व गुणवंत विद्यार्थी व इऔर मान्यवरांची समायोचीत भाषणे झाली.
सूत्रसंचालन पर्यवेक्षक महाविर गोडभरले यांनी केले तर आभार प्रकाश कांबळे यांनी मानले.

About The Author

error: Content is protected !!