शहरातील सिमेंट काँक्रीटचे जागोजागी फोडलेले रस्ते त्वरित दुरुस्त करावे ; शिवसेनेचे ( ठाकरे गट ) निवेदन
अहमदपूर ( गोविंद काळे ) शहरात नविन पिण्याच्या पाण्यासाठी पाईप लाईन करते वेळी गल्ली बोळातील सिमेंट कॉक्रीटचे चांगले रस्ते फोडण्यात आले आहेत ते त्वरीत दुरूस्त करण्याच्या मागणीसाठी शिवसेना ( ठाकरे गट ) यांच्या वतीने नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे
याविषयी सविस्तर माहीती अशी की, संपूर्ण अहमदपूर शहरात नवीन पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन करते वेळेस शहरातील गल्ली बोळातले सिमेंट कॉंक्रेटचे रस्ते फोडून पाईप लाईन करण्यात आली परंतु सदरची पाईप लाईनचे काम पुर्ण झाल्यावर रस्ते बुजवल्यानंतर त्यावर सिमेंट कॉंक्रेट न टाकता थातुर मातुर दगड गोटे टाकून बुजवण्यात आले आहेत. त्यामुळे रस्त्यावरील सततच्या वाहतूकीमुळे त्याठिकाणचे रस्ते जास्त प्रमाणात खड्डे पडून खराब झाले असल्यामुळे रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना, शाळकरी मुलांना, वाहन चालकांना रस्त्यावर चालताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरून चालताना लहान मुले, जेष्ठ नागरिक यांना दगड गोटे तसेच खड्डे यामुळे ठेसा लागून पडत आहेत वाहन चालकांना देखील रस्त्यावरून वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागत असल्यामुळे किरकोळ अॅक्सिडेंटचे प्रमाण देखिल वाढले आहे तरी शहरातील पाईप लाईनमुळे खराब झालेले रस्ते पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करुन घेवून नागरिकांना होणारा त्रास कमी करावा अन्यथा जनतेच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे नगर पालिका मुख्याधिकारी यांना उपशहरप्रमुख शिवकुमार बेद्रे यांनी दिला आहे