अक्षय भालेराव या आंबेडकरी तरुणाच्या खुन्यांना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा द्यावी

अक्षय भालेराव या आंबेडकरी तरुणाच्या खुन्यांना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा द्यावी

भारतीय बौद्धमहा सभेची मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे मागणी

अहमदपूर : ( गोविंद काळे ) येथील भारतीय बौद्ध महासभेच्या तालुका शाखेच्या वतीने नांदेड जवळील बोंढार हवेली या गावात अक्षय भालेराव या आंबेडकरी तरुणाने पुढाकार घेऊन पहिल्यांदा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली याचा राग मनात धरून या गावातील काही जातीयवादी गावगुंडांनी त्याचा निर्घृण खून केला.
या घटनेचा निषेध व्यक्त करत आज अहमदपूर येथील उपविभागीय अधिकारी यांना भारतीय बौद्धमहा सभेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
ही घटना मानवतेला काळीमा फासणारी असून या खुनाची सखोल चौकशी व्हावी व या जातीयवादी गाव गुंडांना तत्काळ अटक करून कठोर शिक्षा व्हावी त्याचबरोबर अक्षय भालेराव यांचे कुटुंब या घटनेने भयभीत झाले असून या कुटुंबीयांना तात्काळ संरक्षण द्यावे. असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर भारतीय बौद्धमहा सभेचे तालुकाध्यक्ष एम एन क्षीरसागर उपाध्यक्ष चंद्रशेखर भालेराव बालाजी दुगाने शहराध्यक्ष संभाजी कांबळे बाबासाहेब कांबळे लेंडेगावकर गौतम कांबळे रमेश तुरेवाले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

About The Author