मोफत सर्व रोग निदान शिबिर संपन्न

मोफत सर्व रोग निदान शिबिर संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले)
न्यू अस्मिता एजन्सीज द्वारा उदगीर येथील शिवकथा सोहळा निमित्य आठाने मंगल कार्यालय, समता नगर येथे मोफत सर्व रोग निदान शिबिर अंतेश्वर तोडकरी यांनी आयोजित केले होते.
या शिबिराचे उद्घाटन शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांच्या हस्ते झाले व प्रमुख पाहुणे म्हणून डॉ विनायकराव पाटील माजी अधिष्ठाता जेजे हॉस्पिटल मुंबई, सुप्रसिद्ध कॅन्सर तज्ञ डॉक्टर अमित पाटील टाटा हॉस्पिटल मुंबई हे उपस्थित होते. या शिबिरास प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ योगीराज चिद्रे, हृदय रोग तज्ञ डॉ नागनाथ कवडगावे, अस्थिरोगतज्ञ डॉ संगमेश्वर सिद्धेश्वरे, स्त्री रोग तज्ञ डॉ श्वेता पाटील, मधुमेह तज्ञ डॉ प्रशांत नवटक्के, अस्थिरोग तज्ञ डॉ आशिष पाटील, प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ यशोधन सताळकर, त्वचारोग तज्ञ डॉ संतोष मानकरी या सर्व तज्ञ मंडळींनी दोन हजार रुग्ण तपासणी केली . तसेच या सर्व रुग्णांना अंतेश्वर तोडकरी यांच्या वतीने मोफत औषध वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती शिवा संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस उमाकांत आप्पा शेटे, प्रांत सदस्य शिवा संघटना दत्ताभाऊ खंकरे, शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. विलास खिंडे, तालुका संपर्कप्रमुख संतोष वळसणे, तालुकाध्यक्ष रामेश्वर कदम, अनंत बुंदे, अजित धनुरे हे मान्यवर होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंतेश्वर तोडकरी यांनी केले. सूत्रसंचालन मच्छिंद्रआप्पा कोरे व नागनाथ बिरादार यांनी केले तर आभार अमित आठाणे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मच्छिंद्र आप्पा कोरे, राजकुमार बेलुरे, राम केंद्रे, विश्वंभर सूर्यवंशी, जयप्रकाश नंदगावे, भीमाशंकर वीरकपाळे, सिद्धांत आठाणे, सिद्धार्थ बेलुरे यांनी प्रयत्न केले.

About The Author

error: Content is protected !!