आरोग्य उपकेंद्रास “कायाकल्प”पुरस्कार मिळाल्याबद्दल कृतज्ञता सोहळा संपन्न
उदगीर(प्रतिनिधी): तालुक्यातील तोंडार प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास केंद्र सरकारचा कायाकल्प पुरस्कार मिळाल्याबद्दल तोंडार येथील सरपंच, उपसरपंच, प्रतिष्ठित नागरिक यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच भरत कोचेवाड हे होते,तर प्रमुख पाहुणे म्हणून ओम् साई सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवकुमार पांडे, उपसरपंच प्रयागबाई नांवदे, माजी सरपंच पती माधव पटवारी, माधव पाटील, ग्राम पंचायत सदस्य निळकंठ बिरादार,सारिका कोचेवाड, ग्राम सेवक मुंढे यु के,सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
काही दिवसांपूर्वी तोंडार येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास गावपातळीवरील आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न, व उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल कायाकल्प पुरस्कार जाहीर झाला होता, तो पुरस्कार जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी यांच्या हस्ते डॉ विठ्ठल चवळे यांना सुपुर्द करण्यात आला, या उपकेंद्र अंतर्गत कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया, बाळंतपण, बालकांचे लसीकरण, गरोदर माता व स्तनदा माताची काळजी घेणे, आशा मार्फत शासनाचा सर्व योजना व माहिती घरोघरी पोहचवणे, स्तनाचा,मुखाचा,व गर्भाशयाचा कॅन्सर साठी तपासणी करणे, प्रथमोपचार,घरी खाटेवर पडून असलेल्या रुग्णांना घरपोच सेवा, नवजात बालकांना त्यांचे वजन,उंची वेळोवेळी तपासणी करणे, कुटुंब नियोजन सर्वे अशा अनेक सेवा या उपकेंद्रा मार्फत पुरविल्या जात असल्याने या बाबींची दखल घेत केंद्र सरकारने “कायाकल्प” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, या वेळी आरोग्य समुदाय अधिकारी विठ्ठल चवळे, उपकेंद्राच्या परिचारिका गिरी मॅडम, सुपरवायझर बेलुरकर, आशा सेविका बबिता सोनकांबळे, विमल सोनकांबळे, अनिता कोचेवाड, भारत कांबळे नागरिक हिरामण सोनकांबळे सह अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.