राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा….प्रा रेखा हाके

राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा….प्रा रेखा हाके

अहमदपूर ( गोविंद काळे ) राष्ट्रवादी पक्षाचे मुंब्राचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपाच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या संदर्भात ट्विटरवर आक्षेपार्ह तथा बदनामीकारक ट्वीट दि ९ जून रोजी करून जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न केला.जिजाऊ, सावित्रीबाई यांच्या महाराष्ट्रात महिलांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात आहेत.याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी भाजपाच्या महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा तथा महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस प्राचार्या रेखा अशोकराव हाके पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा वंदना केंद्रे,शहर उपाध्यक्षा रेखा बाळूरे, जिल्हा संयोजिका संगिता आबंदे पाटील,भाजपा कार्यकर्त्या जगदेवी सोलापुरे आदींची उपस्थिती होती.

About The Author

error: Content is protected !!