अहमदपूरात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार,रूग्णांना फळ वाटप आणी वृक्षारोपण संपन्न

अहमदपूरात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार,रूग्णांना फळ वाटप आणी वृक्षारोपण संपन्न

अहमदपूर ( गोविंद काळे )
माध्यमिक शालांत परिक्षेत विशेष प्राविण्यात उत्तीर्ण झालेल्या शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच ग्रामीण रूग्णालयातील रूग्णांना फळवाटप तसेच बौध्द नगर स्मशानभूमीत वृक्षारोपण करण्यात आले.
येथील युवक नेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध उपक्रम संपन्न करण्यात आले.

येथील बौध्द नगर स्मशानभूमीत किसान आघाडीचे सरचिटणीस दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येवून सदरचे वृक्ष संवर्धनाची जबाबदारी येथील युवकांवर देण्यात आली.

ग्रामीण रूग्णालय येथे माजी मंत्री विनायकराव पाटील तसेच माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांच्या हस्ते फळवाटप करण्यात आले.तसेच सायंकाळी माध्यमिक शालांत परिक्षेत विशेष प्राविण्यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी तथा प्रविण फूलारी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाक्के पाटील,प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख,उपसभापती बाळासाहेब गूट्टे, तालुकाध्यक्ष हनुमंत देवकत्ते यांची उपस्थिती होती.
या प्रसंगी इयत्ता दहावी मध्ये विशेष प्राविण्यामध्ये उत्तीर्ण झाल्या बद्दल सर्व विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते फेटा बांधून सत्कार करण्यात आला.
या वेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवक नेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी केले.
तर गणेशदादा हाक्के पाटील, दिलीपरावजी देशमुख यांची समायोचीत भाषणे झाली.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना उपजिल्हाधिकारी प्रविण फूलारी म्हणाले की,विद्यार्थ्यांनी भविष्याचा वेध घेवून स्वतःला सिध्द करणे गरजेचे आहे. नवनवीन अभ्यास विषय हातातून आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावली गरजेच आहे. पूढील काळात सूखी जिवन जगायचे असेल तर आता किमान पाच वर्ष आळस न करता कठीण मेहनत घ्यावी पूढचे जीवन सुखी संपन्नतेने जगता येईल असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.दिपक बेले यांनी केले तर आभार प्रशांत जाभाडे यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शरद सोनकांबळे,आकाश सांगवीकर,अजय भालेराव, गणेशराव मूंडे,भिमराव कांबळे, विलास चापोलीकर, मूकूंद वाघमारे, गिरीषभाऊ गोंन्टे,दिगंबर वाघमारे,
दिलीप भालेराव, शिवाजी भालेराव,शरद कांबळे,शहारूख पठाण,सय्यद तबरेज, मोहम्मद पठाण, सचिन बानाटे,भैय्यासाहेब सोनकांबळे,प्रदिप कांबळे, अण्णाराव सूर्यवंशी, आदींनी पुढाकार घेतला.

About The Author