उपायुक्त भारत राठोड यांचा वाढदिवस विविध उपक्रम राबवून साजरा
उदगीर(प्रतिनिधी): नवनाथ गायकवाड मराठवाडा मित्र मंडळाच्या वतीने उदगीर नगर पालिकेत मागील अनेक वर्ष मुख्याधिकारी म्हणून सेवा बजावलेले भारत राठोड यांचा 50 वा वाढदिवस विविध उपक्रम राबवून उत्साहात साजरा करण्यात आला. उदगीरची जनता आणि भारत राठोड यांच नातं घट्ट धाग्यानं बांधलं आहे, ते म्हणजे कोरोना सारख्या महामारीत उदगीर नगर पालिकेच्या वतीने केलेले काम आज आठवलं की उदगीरच्या जनतेला त्यांची आठवण येते. उदगीरच्या जनतेनं देव पाहिला नाही पण माणसातला देव भारत राठोड यांच्या माध्यमातुन पाहिला आहे. शांत स्वभाव, सामान्य माणसा बद्द्ल असलेली तळमळ असे अनेक गुण उदगीरच्या जनतेला आवडले होते. अशा माणसाला विसरणं कदापि शक्य नाही, म्हणून त्यांच्या 50 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने उदगीर शहरात रोटी, कपडा, बॅक येथे नवनाथ गायकवाड मराठवाडा मित्र मंडळ उदगीरच्या वतीने केक कापून, अन्नदान, कपडे वाटप व वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी मित्रमंडळाचे संस्थापक नवनाथ गायकवाड, अजमत खान, शेख गौस अहमद, विष्णुकांत राजगोंड, अहमद शरीफ शेख, शेख जमील अहमद, आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ सूर्यवंशी यांनी केले तर आभार जमील शेख यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रवीण हांडे, गिरीश स्वामी, मकबूल शेख त्यांनी प्रयत्न केले.