डॉ.सचिन घोळवे यांची विद्यापीठाच्या विद्या शाखेवर नियुक्ती
उदगीर (प्रतिनिधी) महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम 2016 कलम 34 (4) (ड) अन्वये उच्च विद्या विभूषित विशेष निमंत्रित व्यक्ती म्हणून उदगीर येथील रहिवासी असलेल्या श्यामलाल स्मारक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे माजी उपप्राचार्य भागवतराव घोळवे यांचे चिरंजीव जे चन्नबसवेश्वर फार्मसी कॉलेजमध्ये क्वालिटी अशुरन्स विभागाचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत, ते प्रा. डॉ. सचिन घोळवे यांची स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान या विद्याशाखेवर प्रभारी कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांनी नियुक्ती केली आहे. विज्ञान व तंत्रज्ञान या विद्याशाखेचे अधिष्ठाता या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. व अभ्यास मंडळाचे अध्यक्ष, अभ्यास मंडळांनी नामनिर्देशित केलेली व्यक्ती व पाच विशेष निमंत्रित व्यक्ती सदस्य म्हणून असतात. डॉ. सचिन घोळवे यांचे संशोधन व औद्योगिक व्यवसायातील अनुभवाचा विचार करून त्यांची ही नियुक्ती केली आहे. सदर नियुक्तीचा कार्यकाळ हा ऑगस्ट 2027 पर्यंत आहे. विद्यापीठात विविध प्राधिकरणामध्ये विद्या शाखा ही अभ्यास व संशोधन विषयी समन्वय साधण्यासाठीचे एक महत्त्वाचे प्राधिकरण आहे. अध्यापन संशोधन प्रशिक्षण व निदेशक यांच्या संबंधात विद्या परिषदेने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी विद्याशाखेमार्फत होत असते, तसेच अभ्यास मंडळांनी विचारार्थ पाठविलेल्या बाबी विचारात घेणे व कोणतेही फेरबदलासह विद्या परिषदेकडे शिफारस करण्याचे कार्य देखील विद्या शाखा करत असते. डॉ. सचिन घोळवे हे एम फार्मसी पदुत्तर अभ्यास करण्यासाठी ते संशोधक मार्गदर्शक म्हणून गेली दहा वर्षापासून कार्यरत आहेत. त्यांचे संशोधन राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय नियतकालिक मध्ये प्रकाशित असून अलीकडेच त्यांच्या पेटंटला सुद्धा भारतीय पेटंट कार्यालयाकडून मान्यता मिळालेली आहे. औषध निर्माण शास्त्रात केलेले त्यांचे संशोधन कार्य जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त झालेले आहे. बसवेश्वर महाविद्यालयाने आजपर्यंत फार्मसी क्षेत्रातील अनेक यशाची शिखरे पार केलेली आहेत. आणि या निवडीमुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोहला गेला आहे. सदर निवडीबद्दल पंचाक्षरी शिवाचार्य ट्रस्टचे सचिव भीमाशंकर देवणीकर, प्राचार्य डॉ. संजय थोंटे, प्राचार्य डॉ. ओमप्रकाश भुसनुरे व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व संशोधक विद्यार्थी यांनी घोळवे यांचे अभिनंदन केले आहे.