मराठा सेवा संघाच्या वतीने उदगीरात रविवारी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन
उदगीर – प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मराठा सेवा संघ, उदगीरच्या वतीने दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा दिनांक 18 जून रोजी रविवारी सकाळी दहा वाजता राधे कृष्ण मंगल कार्यालय देगलूर रोड , उदगीर येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात शिक्षक आमदार विक्रमजी काळे यांचा सत्कार करण्यात येणार आहे.विद्यार्थ्यांचा सत्कार माजी गृहराज्यमंत्री संजयजी बनसोडे यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा.विवेक सुकने राहणार आहेत .तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डाॅ. सुधीर जगताप , अध्यक्ष. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था उदगीर, विठ्ठलराव जाधव , कार्यकारी अभियंता मुंबई मनपा , परमेश्वर कदम पोलिस निरीक्षक उदगीर शहर ,प्रकाश साखरे,आबा कदम हे राहणार आहेत. स्वागताध्यक्ष म्हणून उदयसिंह मुंडकर ,सरपंच मादलापुर , बिपीन पाटील , उद्योजक उदगीर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन प्रदीप ढगे , राजकुमार कानवटे ,माधवराव हालगरे,भरत पुंड, प्रा.भास्कर मोरे , ज्ञानेश्वर नकुरे,संदीप जाधव ,कालीदास बिरादार,अंगद पाटील, कमलाकर मुळे,अंकुश हुंडेकर ,दिपक मिरजकर ,प्रा. डॉ. निवृत्ती तिरकमटे , गजानन बिरादार, रामेश्वर बिरादार ,मनोज बिरादार ,संदीप नाईक , राजकुमार माने ,अनिता जाधव ,अनिता जगताप ,मिरा मोरतळे , बबिता पाटील , पुष्पा जाधव आदींनी केलेआहे.