खेळाचे मैदान, व्यायामशाळा आणि साहित्य खरेदीसाठी आ. रमेशअप्‍पा कराड यांच्या प्रयत्नातून १ कोटीचा निधी मंजूर

खेळाचे मैदान, व्यायामशाळा आणि साहित्य खरेदीसाठी आ. रमेशअप्‍पा कराड यांच्या प्रयत्नातून १ कोटीचा निधी मंजूर

लातूर (प्रतिनिधी) : लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील १३ गावात ओपनजीम, व्यायामशाळा, अत्याधुनिक व्यायामशाळा, क्रीडा साहित्याची खरेदी आदी १६ कामासाठी जिल्‍हा नियोजन समितीच्‍या माध्‍यमातून भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड यांनी १ कोटी रूपयाचा निधी मंजूर करून घेतला आहे.

ग्रामीण भागातील तरुणांना विद्यार्थ्यांना खेळाची आवड निर्माण व्हावी त्यांचे शरीर सदृढ बनावे आणि आरोग्य निरोगी राहावे यासाठी भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड यांनी जिल्‍हा नियोजन समितीच्‍या माध्‍यमातून जिल्‍हयाचे पालकमंत्री मा. गिरीशजी महाजन यांच्‍याकडे वेळोवेळी पाठपुरवा करून लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील १३ गावात ओपनजीम, व्यायामशाळा, अत्याधुनिक व्यायामशाळा, क्रीडा साहित्याची खरेदी आदी १६ कामासाठी १ कोटी रूपयाचा निधी मंजूर करून घेतला आहे. लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील लातूर तालुक्‍यातील महाराष्ट्र विद्यानिकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मुरुड येथे विविध खेळाचे मैदान करणे ७ लक्ष रुपये, हनुमान शिक्षण प्रसारक माध्यमिक विद्यालय बिंदगीहाळ येथे क्रीडा साहित्य खरेदीसाठी ३ लक्ष रुपये, ग्रामपंचायत कार्यालय निवळी येथे ओपन जिम करिता ७ लक्ष रुपये आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांदुळवाडी येथे ओपन जिम करिता ७ लक्ष रुपये, रेणापूर तालुक्‍यातील कै गोविंदराव गीते माध्यमिक विद्यालय पानगाव येथे विविध खेळाचे मैदान तयार करणे आणि अत्याधुनिक व्यायाम शाळा उभारणे १४ लक्ष रुपये, आदर्श विद्यालय कारेपूर क्रीडा साहित्यासाठी ३ लक्ष रुपये, जनता विद्यालय पोहरेगाव येथे क्रीडांगण समपातळी करणे ७ लक्ष रुपये, प्राथमिक आरोग्य केंद्र पानगाव येथे ओपन जिम करिता ७ लक्ष, ग्रामपंचायत कार्यालय रामवाडी ओपन जिम ७ लाख रुपये, ग्रामपंचायत कार्यालय घनसरगाव येथे अत्याधुनिक व्यायामशाळा ७ लाख रुपये आणि औसा तालुक्‍यातील भादा सर्कल मधील ग्रामपंचायत कार्यालय शिंदाळा येथे ओपन जिम ७ लक्ष रुपये, ग्रामपंचायत कार्यालय समंदर्गा येथे क्रीडा साहित्य खरेदीसाठी ३ लक्ष रुपये, ग्रामपंचायत कार्यालय शिंदाळावाडी येथे ओपन जिम ७ लाख रुपये, जिल्हा परिषद शाळा ब्रहानपूर येथे ओपन जिम करिता ७ लक्ष रुपये याप्रमाणे तब्बल १ कोटी रुपयाचा निधी लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील कामांसाठी मंजूर झाला आहे.

सदरील निधी उपलब्‍ध करून दिल्‍याबद्दल भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड यांचे त्‍या त्‍या गावातील भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरीकांनी आभार व्‍यक्‍त केले आहेत.

About The Author