श्यामलाल हायस्कूल आनंददाई शिक्षणाचे केंद्र – ऍड. सुपोषपाणि आर्य
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील श्यामलाल मेमोरियल हायस्कूल मध्ये शैक्षणिक वर्ष 2023-24 च्या शाळा सुरुवात होण्याच्या पहिल्याच दिवशी उपस्थित विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा संपन्न झाला. शासनाच्या आनंददाई शिक्षण धोरणानुसार शाळेची सुरुवात आनंददाई वातावरणात व्हावी यासाठी शालेय परिसर सजवण्यात आला, विद्यार्थ्यांना पुष्प, शालेय साहित्याचे वाटप करून नविन विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
संस्थाध्यक्ष ऍड. सुपोषपाणि आर्य, संस्था उपाध्यक्ष गिरीश मुंडकर, संस्था सचिव ऍड. विक्रम संकाये, संस्था सहसचिव अंजुमणी आर्य यांनी सर्व विद्यार्थ्यांना नविन शैक्षणिक वर्षानिमित्त, पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
संस्थाध्यक्ष ऍड. सुपोषपाणि आर्य यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देत या शाळेतील विद्यार्थी सर्व गुणसंपन्न, अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेला समृद्ध भारताचा भक्कम आधारस्तंभ बनावा, असा संदेश दिला.
परिसरातील विद्यार्थी शाळेत यावेत यासाठी शाळेत चाललो आम्ही,स्कूल चले हम, चलो चलो स्कूल चलो, या घोषणा देत प्रभात फेरी काढण्यात आली. प्रभात फेरीमध्ये बैलगाडीत बसून फिरण्याचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला.महाराष्ट्र शासनातर्फे पुरवण्यात आलेल्या मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण संस्था सचिव ऍड. विक्रम संकाये, मुख्याध्यापक आनंद चोबळे , प्र. उपमुख्याध्यापक बालाजी चव्हाण , प्र.पर्यवेक्षक राहूल लिमये , पाठ्यपुस्तक विभाग प्रमुख शेख सईद, सहाय्यक गोविंद बारोळे, उमाकांत सूर्यवंशी, दिनेश बोळेगावे, सोनाळे बालाजी,सतिष बिरादार,तिवारी सचिन, जाधव धनश्री, रोडगे शैलज्जा, पालक, शिक्षक,मान्यवरांच्या उपस्थितीत ईयत्ता 5वी ते 8वी च्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वितरण करण्यात आले.