ग्रामपंचायत कार्यालय सुनेगाव(शेंद्री) तर्फे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात संपन्न
अहमदपूर ( गोविंद काळे ) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि अवघ्या महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा दरवर्षी 6 जून रोजी साजरा होतो.
शिवरायांचा राज्याभिषेक 6 जून 1674 या दिवशी झाला होता. त्यामुळे दरवर्षी 6 जून रोजी तारखेप्रमाणे शिवछत्रपतींच्या अखंड जयघोषाने दणाणणाऱ्या दुर्गराज रायगडावर हा राज्याभिषेक दरवर्षी केला जातो.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुघल साम्राज्याला टक्कर औरंगजेबच्या शक्तीला तोडीस तोड टक्कर देत छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी अत्यंत जिद्द, बुद्धी, चातुर्य, संयमानं स्वराज्य स्थापन केले.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज राज्याभिषेक दिन सोहळा प्रशासनाने महाराष्ट्रात स्वराज्य दिन म्हणुन साजरा करण्याचे आदेश दिले होते त्या आदेशाचे पालन करत ग्रामपंचायत सुनेगाव शेनी शेंद्री येथे स्वराज्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी ग्रामसेवक बिरादार , सरपंच उषा जायभाये, सदस्य आरती बेले,गोपीनाथ जायभाये, राम जायभाये, माजी सरपंच सोपान जायभाये, पत्रकार गोविंद काळे, गोपाळ काळे, सगरबाई जायभाये, श्रीकांत केंद्रे, बाळू काळे, अशोक जायभाये,सखाराम जायभाये, बालाजी वाघमारे,नारायण जायभाये, राजू थगनर आणि गावातील अनेक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते