जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तहसील कार्यालयात वृक्षारोपन
अहमदपूर ( गोविंद काळे ) : येथील तहसील कार्यलयात दि ५ जुन रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे यांच्या हस्ते वृक्षरोपन करण्यात आले यावेळी उपविभागीय अधिकारी यांनी वृक्ष संवर्धना विषयी माहीती सांगताना म्हणाले की,वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी असे संतानी म्हणलेले आहे .कारण वृक्ष हि वंसुधरेची फफ्फुसे आहेत. महत्वाचे म्हंणजे याच फुफ्फुसाद्वारे तुम्हा आम्हाला जगण्यासाठी प्राणवायु आॅक्सीजन मिळत असतो. या पार्श्वभुमीवर वंसुदरेच्या वैभवात भर घालण्यासाठी प्रत्येकाने एक तरी झाड लावुन त्याचे पालनपोषन करणे काळाची गरज आहे प्रत्येकानी राष्ट्रीय कर्तव्य म्हणुन झाडे लावावीत असे सांगीतले
यावेळी तहसीलदार प्रसाद कुलकर्णी , पोलिस निरीक्षक नानासाहेब लाकाळ, नगराध्यक्षा सौ अश्विनीताई कासनाळे वन परिमंडळ अधिकारी एस एम कोंपलवार नगरसेवक अभय मिरकले नगरसेविका सौ.अनुराधाताई नळेगावकर, दैनिक लोकमत चे प्रतिनिधी प्रा विश्वांभर स्वामी , दैनिक सकाळ चे पत्रकार प्रा रत्नाकर नळेगावकर , यांच्यासह चंद्रशेखर भालेराव आदींची उपस्थिती होती