शिरूर ताजबंद येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या हस्ते वृक्षारोपण

शिरूर ताजबंद येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या हस्ते वृक्षारोपण

शिरूर ताजबंद ( गोविंद काळे) : आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शिरूर ताजबंद ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. याचा शुभारंभ जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या हस्ते करण्यात आला.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज शिरूर ताजबंद नगरीमध्ये वृक्ष लागवड करण्यात आले त्या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल भैया केंद्रे, महिला बाल विकास सभापती जि.प.लातूर राठोडसाहेब,बांधकाम सभापती ग्रा.पं.शिरूर ताजबंद विक्रम भोसले, ग्रा.प.सदस्य तथा मनसे नेते जयवंत सगर, ग्रा.प. सदस्य बालाजी जवळगे, ग्रा.प.लिपीक तोफिक किनीवाले, तानाजी वाघमारे, रमेश कौरवार, विनोद ढेपे, सद्दाम शेख,खाजा शेख, आदी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!