खरीप हंगामाच्या मशागत करिता शेतकरी लागला कामाला..!
अहमदपूर ( गोविंद काळे ) : तालुक्यातील खरीप हंगामाच्या मशागत करिता शेतकरी लागला कामाला.! अहमदपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी पुढील खरीप हंगामाच्या मशागती करीता कामाला लागला आहे. शेती कामात मोठ्या प्रमाणात उलथापालथ झाली आहे. यंञाच्या सहाय्याने आता शेतकरी शेतीची मशागत करतात.तरूण शेतकरी धंदा व्यापाराकडे वळले असुन शेतीचे कामे जड असल्याने तरूणु मुले याकडे वळत नाहीत. परंतु ग्रामीण भागात अजुनही इतर रोजगार उपलब्ध नसल्याने तरूण शेतकरी शेतातील मशागत करताना दिसून येत आहे. धवळ्या-पवळ्या ला जुंपून झीsssss बैला झी sssss साझ देवून मशागत करण्यात शेतकरी गुंतला आहे. उन्हाळवाहीची शेतातील बरीच कामे यंत्राद्वारे केली जात असल्यामुळे तरूण शेतकरी बैलाच्या सहाय्याने मशागत करण्यास कंटाळा करतो. माञ ग्रामीण भागातील तरूण बैलाच्या सहाय्याने मशागत करताना दिसून येत आहे. पूर्वी शेतातील कामासाठी शेतकर्यांना दिवसावर अवलंबून राहावे लागत होते, पण या शेती व्यवसायात मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण आल्याने शेतातील अर्धेअधिक शेतकाम यंत्राद्वारे केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचला पण मात्र मजुरांच्या हातचे काम गेले. शेतीचे सर्वच कामे शेतात बाराही महिने मजूर काम करतो उन्हाळ्यात ही मजुरांना शेतकामासाठी मोठी मागणी असायची , काडीकचरा वेचने, परहाटी,फणकट, गोळा करून नष्ट करणे तसेच इतरही कामे असायची,पण आता शेतातील पूर्णच काडीकचरा रोटावेटर द्वारे बारीक केला जातो, तसेच शेतातील उभे असलेले कपाशीचे झाडे ही यंत्राद्वारे पडल्या जाते , यामुळे पुरुष मजुरांचा रोजगार गेला असुन आर्थिक संकट उभे राहिले आहे.