जागतीक पर्यावरण दिनानिमीत्त सिध्दी शुगर येथे वृक्षारोपण

जागतीक पर्यावरण दिनानिमीत्त सिध्दी शुगर येथे वृक्षारोपण

अहमदपुर ( गोविंद काळे ) : जागतिक पर्यावरण दिनानिमीत्त सिध्दी शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लि. महेशनगर, उजना येथे सिद्धी शुगरचे संचालक सुरजभैय्या पाटील यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
या केलेल्या वृक्षारोपनामध्ये सिताफळ, जांभुळ, पेरु, आंबा, करंज आदी रोपांचा समावेश करण्यात आला होता. यावेळी सिध्दी शुगरचे संचालक सुरजभैय्या पाटील , व्हाईस प्रेसिडेंट पी.जी. होनराव साहेब, बाळ भगवान शिक्षक पतसंस्थेचेे माजी चेअरमन, प्रशांत पाटील सर, जनरल मॅनेजर कम फॅक्ट्री मॅनेजर कावलगुडेकर साहेब, केन जनरल मॅनेजर पी.एल. मीटकर, मॅनेजर ( प्रोसेस ) सी .व्ही.कुलकर्णी, चिफ फायनान्स ऑफिसर आर.व्ही., ऊस विकास अधिकारी वाय.आर. टाळेे, ऊस पुरवठा अधिकारी भाकरे, मॅन्यु .केमीस्ट एस.एम.लकडे, सोमवंशी, दिलीप ताटे, अरविंद कदम, शिंदे, संदीप पाटील, शामसुंदर लटपटे, हरिभाऊ पांचाळ आदींची उपस्थिती होती.

About The Author