श्री योगेश्वरी देवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगा दिन

श्री योगेश्वरी देवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगा दिन

योग दिन म्हणजे शरिराला निरोगी ठेवायचे असेल तर प्रत्येकाने नियमित योगा करणे महत्त्वाचे आहे – आदित्य पाटिल

देवणी (लक्ष्मण रणदिवे) : देवणी शहरात श्री योगेश्वरी देवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय देवणी या शाळेत आज दिनांक 21 जून 2023 रोजी राष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला, याप्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थी गावातील नागरिक,पालक व संस्थेचे पदाधिकारी श्री आदित्यजी पाटील साहेब, देवणी योग समितीचे पदाधिकारी श्री उद्धव मल्लेशे तालुका योग समिती अध्यक्ष, व श्री संजय नष्टे योग सदस्य, श्री शंकर जीवने योग सदस्य, प्राचार्य श्री हरकंचे आर.एम. हुमनाबादे एन.बी., सूर्यवंशी टी. व्ही.,श्री घोणसे ए.बी.,श्री कस्तुरे आर.एम.,श्री बिराजदार व्ही.सी., श्री शेख एस.व्ही.,श्री. मलवाडे आर.पी.,श्री.शेवाळे एस.जी.,श्री बिराजदार एस.व्ही.,श्री माका एस.बी.,श्री मारुती भीमराव, श्री राठोड ए.बी., श्री गरड एस.टी, श्री.मोरे बी.आर.,श्री कांबळे डी. एस., श्रीमती बिरादार एन. डी. सौ देवनिकर एस.एल.श्री.वाघमारे एस.व्ही.,श्री मुर्शिद एम. एम यांच्या उपस्थितीत स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून आंतरराष्ट्रीय योग दिनाची सुरुवात केली, याप्रसंगी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री रनदिवे लक्ष्मण यांच्या सह आलेल्या पाहुण्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यांच्या मार्गदर्शनाने योग दिन साजरा करण्यात आला, याप्रसंगी शाळेतील क्रीडा शिक्षक श्री घोणसे ए.बी. मारुती भीमराव यांनी योगासने करुन दाखवली तसेच श्री मलवाडे आर.पी.यांनी सूत्रसंचालन केले व प्राचार्य श्री हरकंचे आर. एम.यांनी सर्वांचे आभार व्यक्त करून अध्यक्षीय समारोप करून कार्यक्रमाची सांगता केली.

About The Author