कै.मोहनराव पाटील आयुर्वेदिक कॉलेज तर्फे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते डॉक्टरांचा सन्मान

कै.मोहनराव पाटील आयुर्वेदिक कॉलेज तर्फे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते डॉक्टरांचा सन्मान

अहमदपूर ( गोविंद काळे ) : चाकुर या दोन्ही तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या शिरूर ताजबंद येथे बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळ , अहमदपूरद्वारा संचलित शिरूर ताजबंद येथील मोहनराव पाटील आयुर्वेद रुग्णालयाच्या वतीने येथील कोवीड सेंटर मधील डॉक्टरांचा उत्कृष्ट कार्य सेवा केल्या बद्दल सन्मान अहमदपूर मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते ‘इंद्रायणी’ निवासस्थानी करण्यात आला.
कोरोणा काळामध्ये कै. मोहनराव पाटील कोवीड सेंटरमध्ये भौतिक सुविधा व आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सोयीसुविधांनी युक्त इमारतीत ५० ऑक्सिजनयुक्त बेड व ५० आयसोलेशन बेड याप्रमाणे एकूण १०० खाटांच्या ( बेड ) अद्यावत करण्यात आला होता.
कोरोनाच्या जागतिक महामारी सोबतच नैसर्गिक आपत्ती व हलाखीची आर्थिक परिस्थिती यामुळे पिचलेल्या ग्रामीण भागातील गोरगरीब कुटुंबाला व कोरोनाग्रस्त रुग्णांना या डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरचा अतिशय चांगल्या प्रकारे सर्व सोयी नियुक्त आधार मिळाला.
सदरील कोविड सेटर हे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून ३ मे रोजी रुग्णांच्या सेवेत सुरू करण्यात आले होते. या कोविड सेंटरमध्ये तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखेखाली एकुण ३४ रुग्णांवर यशस्वी उपचारकरण्यात आले त्यामध्ये सीटी स्कॅनस्कोअर स्कोर १६ असलेला एक रूग्ण, १२ स्कोर असलेले ४ रुग्ण, ११ स्कोर असलेले ३ रुग्ण, ८ स्कोर असलेले ४ रूग्णांवर तसेच ऑक्सीजन लेवल ६० असणाऱ्या एका रुग्णावर कुठलेही महागडे इंजेक्शन न देता आयसीएमआर च्या गाईडलाईन नुसार उपचार करण्यात आले. रुग्णांकडून कसल्याच प्रकारचे शुल्क एक रुपया सुध्दा न घेता निरंतर सेवा करण्यात आली. अहमदपूर तालुक्यातील कोवीडच्या रुग्णाची संख्या अत्यंत कमी व नाहीच्या बरोबर असल्यामुळे सदरील कोविड सेंटर तात्पूरत्या स्वरुपात आज दि. ८ जुन रोजी बंद करण्यात आले.
याठिकाणी सार्वजनिक आरोग्य विभाग , महाराष्ट्र शासन अंतर्गतच्या सेवेतील तज्ज्ञ डॉक्टर्स व पॅरामेडीकल – नॉन टेक्निकल स्टाफ सोबतच धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड चॅरिटेबल हॉस्पिटल , उदगीर येथील काही तज्ञ डॉक्टर्स व पॅरामेडिकल स्टाफ कोवीड रुग्णांवर उपचार करणारे धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ.दत्तात्रय पाटील, वैद्यकीय अधिक्षक डॉ.दत्तात्रय बिरादार, डॉ. अमृत चिवडे आदी सह तलाठी शाम कुलकर्णी, तलाठी नवनीत जामनीक, कोंडीबा पडोळे यांचा सत्कार करण्यात आला.

डॉ.अनुराग कासनाळे, डॉ. सोनम सांगवीकर, डॉ. रोहीणी कांबळे, डॉ.राम यलमटे, जयभी पडीले, आशा मुंडे, आप्पाराव केंद्रे, महेश पांचाळ, रेखा बाबळसरे, मुस्तफा पठाण, वागुळे किशोर, नामदेव कांबळे, परमेश्वर सुर्यवंशी, निलेश कंदे, ऋषीकेश तूपकर आदींनी कोविड सेंटरमध्ये आदींनी कोविड सेंटरमध्ये रुग्णांची सेवा केली.
उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे, तहसिलदार प्रसाद कुलकर्णी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

कोरोना महामारीच्या काळात आमदार बाबासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या कै.मोहनराव पाटील आयुर्वेदीक महाविद्यालयाच्या वतीने कोविड सेंटर चालू केल्यामुळे मतदारसंघातील गोरगरीब जनतेचे आधार केंद्र बनले आहे.

    यावेळी कृषी उत्पन्न बाजार समीतीचे संचालक डि.के. जाधव, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत भोसले, गोपीनाथ जायभाये, व्यंकट शिंदे संदिप शिंदे, पत्रकार गोविंद काळे आदी उपस्थित होते.

About The Author