आमदार बाबासाहेब पाटील यांनी दिले मन्याड नदीवर बॅरेजेससाठी जलसंपदा मंत्री यांना निवेदन
तालुक्यातील मन्याड नदीवरील कोल्हापूरी बंधाऱ्याचे रूपांतर बॅरेजेसमध्ये करा
अहमदपूर ( गोविंद काळे ) : तालुक्यातील मन्याड नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्याचे रुपांतर बॅरेजेसमध्ये करण्याच्या संदर्भात जलसंपदामंत्री ना. जयंतराव पाटील यांना आमदार बाबासाहेब पाटील यांनी मुंबई येथे निवेदन दिले.
दिलेल्या निवेदनात मतदार संघातील अहमदपूर व चाकूर तालुक्यात वाहणारी मन्याड नदी ही प्रमुख व मोठी नदी आहे. मन्याड नदीवर जिल्हा परिषद मार्फत को.प.बंधारे बांधण्यात आलेले असून ते आता पुर्ण नादुरुस्त आहेत व त्यात पाणीसाठा होत नाही . पर्यायाने परिसरातील जनतेला शेतकऱ्यांना , पशुधनाला सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होत आहे . तालुक्यातील पर्जन्यमान अत्यंत अत्यल्प आहे . त्यादृष्टीने भिमा नदीवरील वडापुर ( कुसूर जिल्हा सोलापूर च्या विशेष दुरूस्तीच्या धर्तीवर मन्याड नदीवरील को.प.बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये रूपांतर करण्याचा प्रस्ताव गोदावरी महामंडळाने शासनास दिला होता . तथापी संदर्भ क्र .२ अन्वये निधी उपलब्धते अभावी प्रस्ताव मंजूर करणे जिकरीचे आहे असे कळविले होते. मन्याड नदीवरील को.प.बंधाऱ्याचा समावेश एकात्मिक जल आराखड्यात तर बॅरेजमध्ये रुपांतरण करण्यासाठी पाणी उपलब्धता प्रमाणपत्र घेण्याची आवश्यकता नाही . नदीची या तालुक्यातील लांबी ५२ कि.मी. आहे . त्यामुळे परिसरातील २५ गावांतील जनतेचा , शेतकऱ्यांचा व पशुधनाचा पाणी प्रश्न सुटणार आहे . तिरु नदीवरील को.प.बंधाऱ्याच्या रुपांतरणाचा अशाच प्रकारच्या प्रस्तावाला रक्कम व अन्वेषणासाठी मंजूरी देण्यात यावी. त्या धर्तीवर मन्याड नदीवरील को. प.बंधाऱ्याच्या रुपांतरणाच्या सर्वेक्षण व अन्वेषणास विस्तार व सुधारणा दुरूस्ती अंतर्गत मंजूरी देण्यात यावी. तरी , सदर प्रस्तावाच्या सर्वेक्षण व अन्वेषण करणेबाबत गोदावरी महामंडळास आदेशीत करावे असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.