शेतकऱ्यांना सरसकट पिक विमा मंजूर करा – माजी मंत्री विनायकराव पाटील
अहमदपूर [ गोविंद काळे ] : यावर्षी अहमदपूर व चाकुर तालुक्यात अति पावसामुळे व दूषित वातावरणामुळे सोयाबीन पिकाचे खूप नुकसान झाले आहे. तालुक्यात अवेळी पाऊस,धुई पडून तुरीचा व कापसाचा चक्क खराटा झाल्यामुळे शेतकऱ्यांचे चांगलेच कंबरडे मोडले असल्याने विमा कंपनी ने शेतकऱ्यांना सरसकट पिक विमा मंजूर करावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सदस्य तथा माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे यांच्या मार्फत केली आहे. गतवर्षी नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे महसूल विभाग व कृषी विभागाने केले होते.त्या आधारे शासनाने नुकसान भरपाई चे अनुदान शेतकऱ्यांना दिले होते.तेच पंचनामे ग्राह्य धरून विमा कंपनी कडून पिक विमा मंजूर करून घ्यावा अशी विनंती मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना निवेदनाद्वारे केली.काही शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या पिकांचे फोटो आॅनलाईन कले आहेत तर अनेक शेतकऱ्यांनी फोटो आँनलाईन केले नाहीत तरी सर्व शेतकऱ्यांना सरसकट पिक विमा मंजूर करावा. तसेच लाॅकडाऊन काळातील सरसकट विजबिल माफ करावे अशीही मागणी करण्यात आली आहे. यावर्षी शेती मशागत, लागवड, बियाणे ,खते व काढणी साठी करण्यात आलेला खर्च आलेल्या उत्पन्नातून निघाला नाही. शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर ,कापूस या पिकाला पिक विमा कंपनीकडे कोट्यावधी रुपये चा विमा भरला आहे.मात्र विमा कंपनी शेतकऱ्यांना पिक विमा देण्यास टाळाटाळ करीत आहे.
सोयाबीन,तूर ,कापूस ही शेतकऱ्यांची सर्व नगदी पिके म्हणून ओळखले जातात. यावर्षी दूषित वातावरण व अति पाऊस काळ होऊन पिकांवर पडलेल्या अनेक रोगांमुळे उत्पन्नात कमालीची घट झाली आहे
सोयाबीनचे खूप नुकसान होऊन उत्पन्न घटले आहे.तर पाऊस भरपूर असूनही तुरीचा चक्क खराटा झाला.जाळ धुई मुळे तुरीची सर्व फुले करपून गेली. उत्पन्न घटले. कापूस सुरुवातीला फारच जोमात आला. दृष्ट लागावी असे पीक आले होते पण दूषित वातावरणामुळे त्याची सर्व बोंडे किडकी झाली.कापसावर लाल्या रोग पडून कापूस कोमेजून गेला. या तिन्ही पिकाने यावर्षी शेतकऱ्यांना चांगला दगा -फटका दिल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले असून त्यांनी शेतीत केलेला खर्चसुद्धा यावर्षी निघाला नाही.
अशा शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन एका शिष्टमंडळाद्वारे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सदस्य तथा माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी अहमदपूर यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांच्या कडे केली आहे.सदरील पिक विमा मंजूर न झाल्यास अहमदपूर व चाकुर तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी माजी मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सदस्य विनायकराव पाटील यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी माजी आमदार बब्रुवानजी खंदाडे, त्र्यंबक गुट्टे , राजाभाऊ मजगे, अशोकराव चिंते,आर.डी शेळके, हरीभाऊ येरमे, विठ्ठलराव बोडके, संग्राम चामे, प्रशांत पाटील, शिवाजी बैनगिरे, हणमंत देवकते,राम बेल्लाळे, कमलाकर पाटील,निळकंठ पाटील, राजू खंदाडे, गोविंद गिरी, देवानंद मुळे, अमित रेड्डी,अजय काळे , प्रेमचंद शेळके,शिवराज पाटील, चंदकांत गंगथडे, प्रमोद जोशी, अजित खंदारे, सिद्धार्थकुमार सुर्यवंशी, विक्रम भोसले, राहुल शिवपुजे, निखिल कासनाळे, धनराज पाटील, कमलाकर शेकापुरे,शुकूर जागीरदार, सुखदेव कदम, चंद्रसेन पाटील, प्रताप पाटील, संतोष कोटलवार, शिवराज चोथवे, अर्जुन गंगथडे, शंकर मुळे, शंकर चाटे, पांडुरंग कांबळे, आदिंसह शेतकरी व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.