साने गुरुजी माध्यमिक विद्यालयात छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी

साने गुरुजी माध्यमिक विद्यालयात छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी

लातूर (प्रतिनिधी) : राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोमवार दि. 26 जून 2023 रोजी अवंती नगर येथील सानेगुरुजी माध्यमिक विद्यालयात छत्रपती शाहू महाराज यांची 149वी जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री शेख आय.एच. यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. 2006 पासुन महाराष्ट्र शासनाने 26 जून हा दिवस “सामाजिक न्याय दिन”म्हणून साजरा करण्याचे घोषीत केले आहे त्या अनुषंगाने शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी प्रासंगिक भाषण करत शाहू महाराजांच्या कार्याला उजाळा दिला. याप्रसंगी शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!