महात्मा फुले महाविद्यालयाच्या वतीने पाच दिवसीय योग शिबिर संपन्न

महात्मा फुले महाविद्यालयाच्या वतीने पाच दिवसीय योग शिबिर संपन्न

अहमदपूर ( गोविंद काळे ) : कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी या काळात शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ आणि निरोगी राहण्यासाठी प्रत्येकाच्या दिनचर्येत योग, प्राणायाम आणि ध्यान धारणा आवश्यक असते म्हणून येथील महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार यांच्या प्रेरणेने दूरदृश्य तथा “झूम” आभासी माध्यमातून पाच दिवसीय योग शिबिर घेण्यात आले.आर्ट ऑफ लिव्हिंग शाखा अहमदपूर आणि इतिहास विभाग, महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ५ ते ९ जून या कालावधीत दररोज सकाळी ९ ते १० या वेळेत हे शिबीर घेण्यात आले. आर्ट ऑफ लिव्हिंगचे ज्येष्ठ प्रशिक्षक प्रा. रामेश्वर वायाळ, प्रा. औदुंबर मुळे, डॉ.बब्रुवान मोरे तसेच उदगीर येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता सौंदळे यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले.
या पाच दिवसीय शिबीरात परिसरातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी व पालकांनी सहभाग घेतला. शिबिराच्या माध्यमातून अनेकांना योगासने, प्राणायाम, मुद्रा याबाबत माहिती मिळाली. तसेच चांगल्या शारीरिक स्वास्थ्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळाले.
या शिबिराच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार यांनी सातत्याने प्रेरीत केले तर मुख्य संयोजक डॉ. बब्रुवान मोरे यांच्यासह महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, प्राध्यापक डॉ. सतीश ससाणे, डॉ. नागराज मुळे,डॉ. अनिल मुंढे, डॉ.मारोती कसाब, डॉ. पांडुरंग चिलगर, डॉ. डी. एन. माने, डॉ. प्रकाश चौकटे, डॉ. प्रशांत बिरादार, डॉ. अभिजित मोरे, डॉ. आतिश आकडे, डॉ. सचिन गर्जे , प्रा.परमेश्वर इंगळे तसेच कार्यालयीन अधीक्षक प्रशांत डोंगळीकर, अजय मुरमुरे, चंद्रकांत धुमाळे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

About The Author